Ferfar #13647 · आष्टी
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026श्री संतोष उत्तमराव विधाते, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांनी त्यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं. 36 मधील क्षेत्र 0.01.29 हे.आर. चोमी इनाम नमीन क्षेत्र भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करून मिळणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचेकडे अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने मा.तहसिलदार आष्टी यांनी सादर केलेला अहवाल तसेच वक्फ बोर्ड यांनी सादर केलेला अहवालानुसार सदर इनाम जमीन ही मदतमाश प्रकारची असल्याचे व वक्फ मिळकत नसल्याचे पत्रात नमूद आहे.तसेच प्रकरणात जिल्हा सहनिबंधक बीड यांचेकडून प्राप्त उक्त जमिनीचे चालू बाजारभावाप्रमाणे श्री संतोष उत्तम विधाते, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं.36 मधील क्षेत्र 0.01.29 हे.आर. चोमी क्षेत्राचे मूल्यांकन प्रमाणे होणारे एकूण मूल्यांकन रु.3,83,130/- अक्षरी तीन लक्ष त्र्याऐंशी हजार एकशे तीस रुपये फक्त) इतके आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र दि.17.08.2015 व दि.24.09.2024 मधील तरतुदीनुसार चालू बाजारभावाच्या 5% प्रमाणे होणारी रक्कम रु.19,157/- (अक्षरी एकोणीस हजार एकशे सत्तावन्न रुपये फक्त) देय आहे. सदर रक्कम अर्जदार यांनी चलन क्रमांक NO MH 00 9607433 2026270 दिनांक 04.09.2026 भरणा दिनांक. 04.09.2026 अन्वये शासन खात्यात जमा केल्याचे पत्रात नमूद आहे.
त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड, यांचेकडील आदेश क्र.2025/भुसूवि/इनाम/संतोष-विधाते/कावि-804 दि.25/09/2026 अन्वये हैद्राबाद इनाम व रोख अनुदाने रद्द करणेबाबत अधिनियम, 1954 कलम 6(3) मर्धाल सुधारणा, महाराष्ट्र अधिनियम क्र.25 राजपत्र दिनांक. 17.08.2015 व सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.08 शासन राजपत्र दिनांक 24.09.2024, महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक. 03.03.2025, शासन निर्णय दिनांक. 31.12.2025 मधील तरतुदी अन्वये अर्जदार श्री संतोष उत्तम विधाते, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं. 36 मधील क्षेत्र 0.01.29 हे. आर. चौमी इनाम (मदतमाश) जमीन भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यास परवानगी दिल्याचे पत्रात नमूद असल्याने फेरफार केला असे.
करिता नोंद सादर करत आहे.