सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #13658 · आष्टी

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
177/अ
Talathi
ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 2025/भुसूवि/इनाम/दादासाहेब-काकडे/कावि-359 आदेश दिनांक : 16/10/2026 श्री दादासाहेब सुखदेव काकडे, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांनी त्यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं. 177/अ मधील क्षेत्र 0.40 हे.आर. चोमी इनाम नमीन क्षेत्र भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करून मिळणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचेकडे अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने मा.तहसिलदार आष्टी यांनी सादर केलेला अहवालानुसार प्रतिबंधित मालकीचा फेरफार मध्ये गट नंबर 177/अ हा गट खालसा झाल्याची रामचंद्र शेरसिंग निर्वासित यांची प्रतिबंधित मालक अशी नोंद दिसून येते. तसेच जोडतक्ता मध्ये मूळ मालक रामचंद्र शेरसिंग निर्वासित यांनी कब्जा हक्कांची रक्कम भरणा केल्याची नोंद दिसून आल्याचे पत्रात नमूद आहे.तसेच प्रकरणात जिल्हा सहनिबंधक बीड यांचेकडून प्राप्त उक्त जमिनीचे चालू बाजारभावाप्रमाणे श्री दादासाहेव सुखदेव काकडे, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांचे मोजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं.177/अ मधील क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौमी या जमिनीचे चालू बाजारभावाप्रमाणे प्रमाणे होणारे एकूण मूल्यांकन रु.99,70,500/-अक्षरी नव्याण्णव लक्ष सत्तर हजार पाचशे रुपये फक्त) इतके आहे.महाराष्ट्र शासन राजपत्र दि. 17.08.2015 व दि. 24.09.2024 मधील तरतुदीनुसार चालू बाजारभावाच्या 5% प्रमाणे होणारी रक्कम रु. 4,98,525/- अक्षरी चार लक्ष अठ्ठ्यान्नव हजार पाचशे पंचवीस रुपये फक्त) देय आहे. सदर रक्कम अर्जदार यांनी चलन क्रमांक 011351739 202627M दिनांक 05.10.2026 भरणा दिनांक 06.10.2026 अन्वये शासन खात्यात जमा केल्याचे पत्रात नमूद आहे. त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड, यांचेकडील आदेश क्र.2025/भुसूवि/इनाम/दादासाहेब-काकडे/कावि-359 दि.16/10/2026 अन्वये हैद्राबाद इनाम व रोख अनुदाने रद्द करणेबाबत अधिनियम, 1954 कलम 6(3) मर्धाल सुधारणा, महाराष्ट्र अधिनियम क्र.25 राजपत्र दिनांक. 17.08.2015 व सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.08 शासन राजपत्र दिनांक 24.09.2024, महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक. 03.03.2025, शासन निर्णय दिनांक. 31.12.2025 मधील तरतुदी अन्वये अर्जदार दादासाहेब सुखदेव काकडे, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं. 177/अ मधील क्षेत्र 0.40 हे. आर. चौमी इनाम (मदतमाश) जमीन भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यास परवानगी दिल्याचे पत्रात नमूद असल्याने फेरफार केला असे. करिता नोंद सादर करत आहे.