Ferfar #2403 · कोतन
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार:– छबाबाई मोहन पुरी रा. कोतन ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचे अनुक्रमे बॉंड क्र. DZ 251321 वरील वाटपपत्र दाखल करून कळविले कि, आम्ही तडजोडपत्र लिहून देणार हे नात्याने आई-मुले बहिण-भाऊ एकत्रित हिंदू कुटुंब पध्दती नुसार आहेत सदरील जमीन वारसा आधारे सामाईक आलेली आहे. छबाबाई मोहन पुरी यांनी त्यांची मुले 1) सुखरूप मोहन पुरी (मुलगा), 2) यमुनाबाई भाऊसाहेब गिरी (मुलगी),3) मुक्ता मोहन पुरी (मुलगी),4) जिजा प्रकाश भारती (मुलगी) रा. कोतन ता. पाटोदा जि. बीड यांनी खालीलप्रमाणे जमिनी वाटप करून दिल्या/घेतल्या आहेत.
1)सुखरूप मोहन पुरी यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 27 मध्ये ला.यो. 0.1389 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.0050 गट नं. 58 मध्ये ला.यो. 1.0100 हे.आर.चौ.मी.
2)मुक्ता मोहन पुरी यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 58 मध्ये ला.यो. 0.4000 हे.आर.चौ.मी.
हक्कसोड देणार 1) छबाबाई मोहन पुरी, 2) यमुनाबाई भाऊसाहेब गिरी(मुलगी), 3) जिजा प्रकाश भारती(मुलगी), यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीमधील आपला कायमचा हक्क हक्कसोड घेणार सुखरूप मोहन पुरी व मुक्ता मोहन पुरी यांच्या हक्कात भाऊ- बहिणीच्या, मुलाच्या प्रेमापोटी विना मोबदला यांच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे.
करीता अर्जदार यांनी अर्ज वरीलप्रमाणे समंती वाटपपत्र करून ठेवलेवरून व सदरचे समंती वाटपपत्र दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीसत्व सादर.