सातबारा Watch

← उंबरविहरा

Ferfar #2118 · उंबरविहरा

पाटोदा, बीड · JSON

Type
दुरुस्ती नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
बी. के. दांडगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- दुरुस्ती नोंद अर्जदार :- भरत रघुनाथ राजपुरे रा. उंबरविहिरा ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व अर्जासोबत रक्कम रुपये ५०० किंमतीच्या बाँड क्र.DU 776415 दि.22/09/2026 वरील शपथपत्र सोबत देऊन कळविले कि,माझे नावे मौजे उंबरविहिरा येथे गट क्र.166 मध्ये 0.59.00 हे.आर एवढी शेतजमीन असुन माझे वडील नामे रघुनाथ दादा राजपुरे यांचे नावावरुन माझ्या नावे वाटपा आधारे करण्यात आली होती. तशी आज रोजी मूळ हस्तलिखित ७/१२ व संगणकीकृत ७/१२ वर फेर क्र.२०५ ने नोंद आहे परंतु माझ्या नावासमोर असलेला फेर क्र.२०५ हा आम्ही बँक कामासाठी मागणी केला असता तो फेरफार मूळ फेरफार नोंद वहिला माझ्या नावाने नोंदवलेला नाही.सदर फेरची नक्कल न मिळाल्यामुळे पिक कर्ज व इतर सर्व शासकीय सवलती मिळत नाहीत.त्यामुळे शासनाचे लाभापासून वंचीत राहत आहोत.तरी माझ्या नावापुढे नवीन फेरफार नोंद घेऊन मला फेरफार देण्यात यावा.असे वरील प्रमाणे अर्जासोबत ५०० किंमतीच्या बाँड क्र. DU 776415 वर शपथपत्र दाखल केलेवरुन मूळ अभिलेख ७/१२ व फेरफारचे अवलोकन केले असता वरीलप्रमाणे ७/१२ वर यापूर्वीच अर्जदार यांचे नावे दाखल असल्याचे दिसुन येते.परंतु फेरफार क्र.२०५ ला अर्जदार यांचे नावाने नोंद आढळुन येत नाही. करीता अर्जदार यांचे नावाने फेरफार रजिस्टरला नोंद आढळुन येत नसल्याने वरीलप्रमाणे अर्ज व शपथपत्र दाखल केलेवरुन दुरुस्ती नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर.