सातबारा Watch

← तांबाराजुरी

Ferfar #4343 · तांबाराजुरी

पाटोदा, बीड · JSON

Type
दुरुस्ती नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
835
Talathi
बी. के. दांडगे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:-दुरुस्ती नोंद अर्जदार अशोक बप्पा तांबे यांनी अर्ज सादर करुन कळविले आहे कि,माझे वडील नामे मयत खातेदार बप्पा काशिनाथ तांबे यांचे दि. 13/03/2020 रोजी निधन झालेले असून, त्यांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसांची नोंद घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यानुसार फेरफार क्र. 3798 अन्वये बप्पा काशिनाथ तांबे यांचे कायदेशीर वारसांची वारस नोंद घेण्यात आलेली आहे. मात्र सदर फेरफारामध्ये गट क्र. 835 ची नोंद घेणे राहून गेलेली आहे. सदर बाब अर्जदार अशोक बप्पा तांबे यांनी अर्जाद्वारे निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यामुळे फेरफार क्र. 3798 मधील वारस नोंद कायम ठेवून, सदर वारसांची नावे गट क्र. 835 च्या अधिकार अभिलेखात नोंदविण्यासाठी दुरुस्ती वारस फेरफार नोंद घेण्यात येत आहे. वारसांची नावे :- नाते 1) कांताबाई बप्पा तांबे - पत्नी 2) अशोक बप्पा तांबे - मुलगा 3) जयश्री संभाजी पवळ - मुलगी 4) संतोष बप्पा तांबे - मुलगा वरीलप्रमाणे वारसांची नावे गट क्र. 835 च्या अधिकार अभिलेखात नोंदविण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र, फेरफार क्र. 3798 व अर्जदाराचा अर्ज सादर केलेवरुन सदर दुरुस्ती वारस फेरफार नोंद घेण्यात येत आहे.