सातबारा Watch

← सावरगाव सोने

Ferfar #1066 · सावरगाव सोने

पाटोदा, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
छाया आनंदराव मेश्राम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 संमती वाटणीपत्र अर्जदार :- अपृगाबाई सर्जेराव देवडे, वय 70 वर्षे, धंदा शेती, रा. सावरगाव सोने, ता. पाटोदा, जि. बीड. यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये ५०० किंमतीचा बॉंड क्र. DU 776479 वर नोटरी संमती वाटणीपत्र दाखल करून कळविले की, ग्राम महसूल अधिकारी सज्जा - सोनेगाव येथे अर्जदार अपृगाबाई सर्जेराव देवडे यांचे नावे मौजे सावरगाव सोने येथील गट नं. 55 मध्ये खातेदार अपृगाबाई सर्जेराव देवडे, लक्ष्मी विजय देवडे, ख़ुशी विजय देवडे, श्रीतेज विजय देवडे सामाईक खात्या मधील लागवडीलायक क्षेत्र 1=21 हे. आर. असून त्यांनी गट नं. 55 मधील जमीन खाते विभाजन ( 8 अ वेगळे ) करण्यासाठी पुढीलप्रमाणे वाटप केले आहे, 1) अपृगाबाई सर्जेराव देवडे 0=3025 आर, 2) लक्ष्मी विजय देवडे 0=3025 आर, 3) ख़ुशी विजय देवडे 0=3025 आर, 4) श्रीतेज विजय देवडे 0=3025 आर. करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरिलप्रमाणे हक्कसोड संमती वाटपपत्र करून ठेवलेवरून व सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते. करिता मंजुरीस्तव सादर.