सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32296 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 अर्जदार बाबासाहेब जिजा काकडे रा.गेवराई यांनी अर्ज व खरेदी खताच्या नकला देवून कळविले आहे कि, मौजे गेवराई येथील स.नं.57 मधील मूळ मालक मंजाराम भिकाजी काकडे यांचे कडून भागुबाई लिंबाजी धापसे यांनी प्लॉट नं.17 ज्याचे क्षेत्र 0.0272आर क्षेत्र खरेदीखत क्र.2097 दि.08/09/1987 रोजी रक्कम रु.4000 मध्ये खरेदी केला होता. तोच प्लॉट भागुबाई लिंबाजी धापसे यांनी 1)सुनील विश्वनाथ देशमुख 2)संजय विश्वनाथ देशमुख यांना खरेदीखत क्र.1904 दि.02/07/1991 रोजी रक्कम रु.18000 मध्ये कायम विक्री केला आहे. सुनील विश्वनाथ देशमुख हे मयत झाल्यानंतर त्यांच्या नावावरील प्लॉट रेखाबाई सुनील देशमुख यांचे नावे झाले आहे. त्याच प्लॉट मधील 0.0096आर क्षेत्र बाबासाहेब प्रभाकर चाळक यांनी 1)रेखाबाई सुनील देशमुख 2)संजय विश्वनाथ देशमुख यांचेकडून खरेदीखत क्र.888 दि.06/04/2000 रक्कम रु.55000 मध्ये खरेदी केले आहे.व प्लॉट नं.17 ज्याचे पूर्ण क्षेत्र 0.0272आर पैकी 0.0176आर क्षेत्र अर्जदार बाबासाहेब जिजा काकडे यांनी 1)रेखाबाई सुनील देशमुख 2)संजय विश्वनाथ देशमुख यांचेकडून खरेदीखत क्र.3666 दि.18/09/2003 रक्कम रु.450000 मध्ये कायम खरेदी केले आहे. तसेच खरेदीखत क्र.4530 दि.01/12/2003 रोजी रक्कम रु.125000 मध्ये 0.0096आर अर्जदार बाबासाहेब जिजा काकडे यांनी बाबासाहेब प्रभाकर चाळक यांचे कडून कायम खरेदी करून घेतले आहे.म्हणजेच प्लॉट नं.17 चे पूर्ण 0.0272आर क्षेत्र अर्जदार बाबासाहेब जिजा काकडे यांनी खरेदी करून घेतले आहे. करिता अर्जदार बाबासाहेब जिजा काकडे यांचे नावे 0.0272आर क्षेत्राची नोंद घेण्यात यावी. असा अर्ज व खरेदी खताच्या नकला सादर केल्यावरून नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर. टीप: खरेदी देणार मयत असून आज रोजी 7/12 वर त्यांचे वारस 1)निलावती मंजाराम काकडे 2)सुंदर मंजाराम काकडे 3)बाळासाहेब मंजाराम काकडे यांचे नावे आहे.करिता त्यांचे क्षेत्रातुन 0.0272आर क्षेत्र देणे योग्य वाटते.