सातबारा Watch

← बहिरवाडी

Ferfar #9465 · बहिरवाडी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
प्रमोद राम कोळपकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती मधील जमिनीचे मूळ मालक मयत निवृत्ती बाबुराव शेंडगे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस राधाकिसन निवृत्ती शेंडगे, बाबासाहेब निवृत्ती शेंडगे व अरुण निवृत्ती शेंडगे यांच्या नावे फेरफार क्रमांक ५८७०, दिनांक २८/०३/२०१४ अन्वये वारस हक्काची नोंद करण्यात आल्याचे वादपत्रात नमूद आहे मौजे बहिरवाडी, ता. जि. बीड येथील गट क्रमांक ३५ मधील एकूण क्षेत्रापैकी ०१ हे. २५ आर क्षेत्राच्या मालकी हक्कासंदर्भात वादी राधाकिसन निवृत्ती शेंडगे व प्रतिवादी बाबासाहेब निवृत्ती शेंडगे यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने, वादी यांनी मा. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, बीड येथे विशेष दिवाणी दावा क्र. १४४/२०२६ दाखल केला होता.सदर प्रकरणामध्ये वादी व प्रतिवादी यांच्यात परस्पर संमतीने तडजोड झाल्याने, दिनांक १२/०९/२०२६ रोजी लोकअदालतीमध्ये तडजोडपत्र सादर करण्यात आले असून, मा. न्यायालयाने सदर तडजोडपत्राची नोंद घेतलेली आहे.सदर तडजोडपत्रातील अटी व शर्तींनुसार गट क्रमांक ३५ राधाकिसन निवृत्ती शेंडगे यांच्या नावावर महसूल अभिलेखात दाखल असलेल्या ० हे. ९४ आर क्षेत्रापैकी ० हे. १५ आर क्षेत्र तडजोडपत्रातील अटींनुसार बाबासाहेब निवृत्ती शेंडगे यांना देण्याचे वादी व प्रतिवादी यांच्यात मान्य करण्यात आले आहे.त्यामुळे तडजोडपत्रातील अटी तसेच मा. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, बीड यांचेकडील विशेष दिवाणी दावा क्र. १४४/२०२६ मधील दिनांक १२/०९/२०२६ रोजीच्या लोकअदालतीतील तडजोडीच्या आदेशानुसार गाव अभिलेखात नोंद केली.