सातबारा Watch

← बोरखेड

Ferfar #3146 · बोरखेड

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
प्रमोद राम कोळपकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखवले मिळकती मधील खातेदार सौदागर शिवाजी भिसे यांच्या नावासमोर नोंदविण्यात आलेल्या अ.पा.क. (अज्ञान पालककर्ता) या नोंदीबाबत संबंधित अर्जदार यांनी नाव कमी करण्यासाठी अर्ज सादर केला आहे.सदर अर्जासोबत अर्जदार यांनी दिनांक 14/10/2026 रोजीचे नोटरीकृत शपथपत्र, बोरखेड कनिष्ठ महाविद्यालय , बोरखेड यांचे दिनांक ३१/०५/२०२३ रोजीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच विद्यार्थी प्रवेश नोंदणी रजिस्टरमधील निर्गम उतारा नोंदीची प्रत सादर केली आहे.सदर कागदपत्रांमध्ये अर्जदार यांचे नाव सौदागर शिवाजी भिसे , जन्मदिनांक ०२/१०/२००५ असा नमूद असून, अर्जदार यांनी वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. त्यानुसार, सादर केलेली कागदपत्रे व अभिलेखातील नोंदी विचारात घेऊन, संबंधित गट क्रमांक ३४१ च्या सातबारा उताऱ्यावरील अर्जदार यांच्या नावासमोर असलेली अ.पा.क. नोंद कमी करण्याबाबत वयाच्या पुराव्या वरून गाव अभिलेखात नोंद केली.