Ferfar #3281 · जवळबऩ
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वादी- शुभम बप्पासाहेब गायकवाड वय 22 वर्षे धंदा शेती राहणार जवळबन तालुका केज जिल्हा बीड
प्रतिवादी-1)बप्पासाहेब आप्पाराव गायकवाड वय 47 वर्षे धंदा शेती राहणार जवळबन तालुका केज जिल्हा बीड
2)बालिका बप्पासाहेब गायकवाड वय 44 वर्ष धंदा शेती राहणार जवळबन तालुका केज जिल्हा बीड
3)सुरज बप्पासाहेब गायकवाड वय 20 वर्षे धंदा शेती राहणार जवळबन तालुका केज जिल्हा बीड
दावा-सरस निरस मनाने वाटणी करून वेगळा ताबा मिळणे बाबत.
समेटपत्र
1)असे की दाव्यातील प्रतिवादी नंबर एक व दोन हे वादीचे आई-वडील असून प्रतिवादी नंबर तीन हा वादीचा सख्खा भाऊ आहे. वादी व प्रतिवादी वादी हे हिंदू एकत्र कुटुंबाचे घटक सदस्य आहेत.
2)असे की प्रस्तुत दाव्यातील वादग्रस्त हिंदू एकत्र कुटुंबाची वडीलोपार्जित जमीन मिळकत मौजे जवळबन तालुका केज जिल्हा बीड येथील असून तिचे वर्णन खालील प्रमाणे आहे. हा मजकूर वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
अ)वादी नामे शुभम बप्पासाहेब गायकवाड यांच्या हिस्से वाटणीस आलेल्या जमिनीच्या तपशील खालील प्रमाणे आहे.
सर्वे नंबर 118/3 मधील 0.10 आर जमीन व 127/3 मधील 0.36 आर जमीन वाटून आलेली आहे.
ब)प्रतिवादी नंबर एक बप्पासाहेब आप्पाराव गायकवाड यांच्या हिस्से वाटणीस आलेल्या जमिनीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
सर्वे नंबर 118/3 मधील 0.19 आर जमीन वाटून आली आहे.
येणे प्रमाणे जमीन मिळकती वाटून देण्याचे ठरलेले आहे. हा मजकूर वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
3)असे की प्रस्तुत दाव्यातील प्रतिवादी नंबर 2 नामे बालिका बप्पासाहेब गायकवाड व सुरज बप्पासाहेब गायकवाड यांनी दाव्यात असणारा त्यांचा अविभाज्य हिस्सा हा वादी व प्रतिवादी यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे.हा मजकूर वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
4)असे की प्रस्तुत दाव्यातील वादी व प्रतिवादी यांनी सदरील समेटपत्रा आधारे स्वतःचे नाव महसूल अभिलेखात नोंदवून वंशपरंपरागत उपभोग घेत जाणे त्यास वादी अथवा प्रतिवादी उजर, आक्षेप घेणार नाहीत.हा मजकूर वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
करिता मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर केज यांचे न्यायालयातील निशाणी क्र 12B/2026 व दि.दा.मु.न. 88/2026 दि 13/03/2026 रोजी समेटपत्रा प्रमाणे अर्ज व समेटपत्र दिल्याप्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर.