Ferfar #4145 · घरणी
चाकुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- शुभम सुरेश हंगरगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांचे न्यायालय
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/एमएजी/जेनासा/अ
आदेश दिनांक : 31/08/2026
मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, अहमदपूर यांच्या न्यायालयाने आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007 प्रकरण क्रमांक 2026/एमएजी/जेनासा/अ मध्ये दिनांक 31/08/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार अर्जदार श्री. सदाशिव शंकर भोपळे व श्रीमती लक्ष्मीबाई सदाशिव भोपळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.
सदर आदेशातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार, गैरअर्जदार श्री. संतोष सुभाष भोपळे यांच्या नावे मौजे घरणी ता. चाकूर येथील जमीन गट नं.27 मधील क्षेत्र 0.64 हे आर या जमिनीचा नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 1755/2025 अन्वये घेण्यात आलेला फेरफार क्रमांक 3933 रद्द करून त्यानुसार महसुली अभिलेखात नोंद घेण्याचे आदेश ग्राम महसूल अधिकारी, घरणी, ता. चाकूर यांना देण्यात आलेले आहेत.
त्याअनुषंगाने सदर मा. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून खरेदीखत दस्त क्रमांक 1755/2025 अन्वये घेण्यात आलेला फेरफार क्रमांक 3933 रद्द करण्यात येत असून, सदर जमिनीच्या महसुली अभिलेखात न्यायालयीन आदेशानुसार आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली आहे.
मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, अहमदपूर यांचा दिनांक 31/08/2026 रोजीचा न्यायालयीन आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे.