Ferfar #3820 · चापोली
चाकुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- परमेश्वर श्रीधर वैद्य
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026अर्जदार वि.का.सेवा.सह.सो.मर्या.चापोली मार्फत गटसचिव यांनी अर्ज दिले नुसार नोंद घेण्यात येते कि,मौजे चापोली ता. चाकूर जि. लातूर येथील खुला प्लॉट, जिची लांबी पूर्व-पश्चिम 110 फूट व रुंदी दक्षिण-उत्तर 110 फूट, क्षेत्र 12100 चौरस फूट ही जागा मूळ मालक शमशुद्दीन अवलीयासाहेब मोमीन यांच्याकडून नोंदणीकृत खरेदीखत क्र. 2999 (दि. 18/12/1982) नुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. चापोली यांनी कायदेशीर खरेदी करून घेतलेली आहे.
सदर जागेचे मूळ विक्रेते शमशुद्दीन अवलीयासाहेब मोमीन हे मयत झाल्यानंतर सदर गट क्र. 260 च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे कायदेशीर वारसदार यांची वारसाहक्काने नावे दाखल झालेली आहेत. त्यानंतर वारसदार श्री. खाजा शमशोद्दिन मोमीन यांनी दिनांक 24/07/2025 रोजी नोटरी समक्ष संमतीपत्र लिहून देऊन, वरील खरेदी केलेल्या क्षेत्राची नोंद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. चापोली यांच्या नावे 7/12 उताऱ्यावर अथवा अधिकार अभिलेखात घेण्यास संमती असल्याचे व त्याबाबत आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग 361 साठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. चापोली यांचे क्षेत्रा पैकी 0.05 आर क्षेत्र संपादित झाले असून उर्वरित क्षेत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. चापोली यांचे नावे नोंद करण्यात येत आहे.
सबब, उपलब्ध नोंदणीकृत खरेदीखत, भूसंपादन अवार्ड व वारसांचे संमतीपत्र ग्राह्य धरून, मौजे चापोली येथील गट क्र. 260 मधील नमूद खरेदी क्षेत्राची नोंद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. चापोली यांच्या नावे अधिकार अभिलेखात दाखल करण्यास ही फेरफार नोंद घेण्यात आली