Ferfar #1939 · रामेगाव
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार – गोपाळ रंगराव बुदंगे रा.रामेगाव ता.औसा जि. लातुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की, मौजे रामेगाव शिवारातील जमीन गट नं 4, 13, 19 व 281 मध्ये त्यांची सामाईक मालकीची वडीलोपार्जीत जमीन असुन सदरील 7/12 च्या इतर हक्कामध्ये प्रयागबाई ग्याना बुदंगे, सरुबाई ग्याना बुंदगे, भागाबाई ग्याना बुंदगे अशी वारसाची नावे हस्तलिखीत फेरफार 118 नुसार नावे 7/12 वरती आलेली आहेत. तरी महाराष्ट्र शासन निर्णय प्रमाणे 1. रा. भु. अ. आ. का. 4/रा.स./90/2018 जमाबंदी आयुक्त व संचालक भुमि अभिलेख (म.राज्य) पुणेदिनांक – 07/01/2019. 2. महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग मंत्रालय मुंबई - 400032 शासन परिपत्रक क्र.सा. 1498/प्र.क.184/ल. 6 दिनांक – 9/03/1998 नुसार 7/12 च्या इतर अधिकारातील अभिलेखातील वारसांच्या नोंदी मालकी हक्कामध्ये घेण्याबाबत आदेशीत असल्याने अर्जदार यांच्या आत्याची नावे 7/12 च्या इतर हक्कातील वारसाची नावे मालकी हक्कामध्ये आमच्या वडीलांच्या वारसामध्ये सामाईक मध्ये नावे घेण्या बाबत अर्ज व शपथपत्र दाखल केल्यानुसार प्रयागबाई ग्याना बुंदगे हे वडीलाकडील नाव असुन त्याचे सासरकडील नाव प्रयागबाई दामोदर शेळके असे नाव आहे तरी त्या दिनांक 12/08/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांचे पती सुध्दा दामोदर ईश्वरा शेळके हे सुदधा दि नांक 12/08/2025 रोजी मयत असुन त्यांना दोन मुले आहेत 1. हणमंत दामोदर शेळके व 2. श्रीमंत दामोदर शेळके अशी दोन मुले वारस आहेत असे सरपंच रामेगाव ग्राम पंचायत वारस प्रमाणपत्र, मुत्युपत्र व आधारकार्ड प्रमाणपत्र वारस नोंदीकरीता दाखल केले आहे. 2. सरुबाई ग्याना बुंदगे ऐवजी सासरकडील नाव सरस्वती गणपती सिरसले व 3. भामाबाई ग्याना बुंदगे ऐवजी सासरकडील लताबाई रतनराव आचवले असे सरपंच यांचे प्रमाणपत्र आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व शपथपत्र जोडुन दिलेवरुन त्यांची वारसाचे नावे मालकी रकान्यात सहहिस्सेदार म्हणुन नोंद विण्याबाबत फेरफार घेण्यात येत आहे. तसेच सदरील रामेगाव गट नं 281 मधील 7/12 च्या इतर अधिकार अभिलेखातील वारसामध्ये गुणाबाई रंगराव असे वारसाचे नाव संगणकीकृत 7/12 वरती चुकीचे दर्शविले असल्याने फेरफार क्रमांक 118 व हस्तलिखीत 7/12 गट नं 281 चे अवलोकन केले असता सदरील शेतजमीनीच्या मिळकतीशी सदरील नावाचा कोणताही हितसंबंध नसल्याने सदरील नाव गट नं 281 वरुन कमी करण्या करीता फेरफार नोंद घेण्यात येत आहे. अर्ज व 100 रु बॉन्डवरती रजि नोट्ररीकृत शपथपत्र अ क्र 626/2026 दिनांक – 1/10/2026 रोजी वारसाचे शपथपत्र, मुत्यु प्रमाणपत्र, हस्तलिखील 7/12 व फेरफार प्रत इत्यादी कागदपत्राचे अवलोकन करुन सदरील नोंद घेण्यात येत आहे. ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.