Ferfar #4889 · शेळगाव
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार कृष्णाजी मल्हारी शेंडकर रा. शेळगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हिजन परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 666/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे शेळगाव , ता.परंडा येथील जमीन गट नं. 1263, 1264, 1287, 1288 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.
1) वादी :- कृष्णाजी मल्हारी शेंडकर यांना
गट नं. 1263 मध्ये क्षेत्र 00 हे 50 आर
गट नं. 1264 मध्ये क्षेत्र 00 हे 50 आर
गट नं. 1287 मध्ये क्षेत्र 01 हे 48 आर
2) प्रतिवादी नं. 4 :- गोकुळ मल्हारी शेंडकर यांना
गट नं. 1263 मध्ये क्षेत्र 00 हे 56 आर
गट नं. 1264 मध्ये क्षेत्र 00 हे 35 आर
गट नं. 1288 मध्ये क्षेत्र 01 हे 58 आर
तसेच ज.ग.नं. 1287 मध्ये असलेल्या विहिरीमध्ये वादी कृष्णाजी व प्रतिवादी नं. 4 गोकुळ यांचा समान हिस्सा राहील. प्रतिवादी नं. 1 ते 3 यांनी त्यांचा असलेला हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं. 4 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 15/09/2026 Exh. 18 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.