Ferfar #3694 · कानेगाव
लोहारा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
न्यायालयीन तडजोड: अर्जदार शशिकांत उमाकांत वैरागकर, रा. कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव यांनी दिनांक: 30/10/2026 रोजी अर्ज व सोबत मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहारा यांचे न्यायालयात दाखल शशिकांत विरुद्ध उमाकांत व ईतर; आर. सी. एस. क्रमांक: 95/2026 अन्वये प्राप्त न्यायालयीन तडजोडपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की, वादी: शशिकांत उमाकांत वैरागकर आणि प्रतिवादी: 1. श्रीकांत उमाकांत वैरागकर, 2. रविकांत उमाकांत वैरागकर; यांच्यामध्ये गाव कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील कौटुंबिक वडीलोपार्जित जमीनीबाबत खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे:
अनु. क्र. नाव. सर्वे/गट क्र. क्षेत्र (हे.आर)
1. श्रीकांत उमाकांत वैरागकर, 284/2/1, 0.9700,
2. रविकांत उमाकांत वैरागकर, 284/2/1, 0.9800,
3. शशिकांत उमाकांत वैरागकर, 314/2/2, 1.1400,
करिता दिनांक: 07/10/2026 रोजी श्री. शिवराज. सं. पाटील, मा. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहारा आणि वादी तर्फे विधीज्ञ श्री. एम. एस. वचने व प्रतिवादी तर्फे विधीज्ञ श्री. एम. यु. जट्टे यांच्या समक्ष करण्यात आलेल्या तडजोड-आधारे प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.