Ferfar #641 · थोरलीवाडी
उमरगा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कोर्ट तडजोड
अर्जदार: शिवाजी व्यंकट चेंडकापुरे रा.थोरलीवाडी यांनी अर्ज व सोबत राष्ट्रीय लोक अदालत दिवाणी व फौजदारी न्यायालय ( विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 केंद्रीय कायदा चे कलम 19 नुसार आयोजित ) यांचे न्यायालयातील दि.दा.नं.407/2026 निशाणी क्र. 9 दि. 12/.09/2026 च्या अवार्डची छायांकित प्रत दिले वरून नोंद घेण्यात येते कि, मौजे थोरलीवाडी येथील सर्व्हे नं./गट नं 18 मध्ये क्षेत्र 02 हे. 43 आर व सर्व्हे नं./गट नं 22/3 मध्ये क्षेत्र 01 हे. 71 आर ही मिळकत शिवाजी व्यंकट चेंडकापुरे, श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे, रामुबाई रायाप्पा खवडे, बसवराज सिद्राम चेंडकापुरे, मल्लीनाथ सिद्राम चेंडकापुरे, सुरेखा माधव सास्तुरे,रेखा फुलचंद मंडले, उषा रमेश चेंडकापुरे,लक्ष्मण रमेश चेंडकापुरे,रोहन रमेश चेंडकापुरे,लिंबाजी व्यंकट चेंडकापुरे, दैवताबाई दशरथ भोसले,संगीता रायाप्पा पाटील, जेटप्पा व्यंकट चेंडकापुरे यांचे सामाईक नावे असून ही जमीन येथील एकत्रित कुटुंबाची जमीन असून ती त्यांनी पुढील प्रमाणे तडजोडीने वाटणी करून दिली आहे.
1. शिवाजी व्यंकट चेंडकापुरे यांचे हिश्यास स.नं/ग.नं 22/3 मध्ये क्षेत्र 00 हे. 86 आर पैकी पहिला उडाण तुकडा क्षेत्र 00 हे.37 आर क्षेत्र ज्याची चतु:सीमा पुवेस दापेगावे यांची जमीन, पश्चिमेस श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे यांच्या हिस्स्यात वाटून दिलेली जमीन दक्षिणेस व उत्तरेस 1 ते 13 यांच्या सामाईक नावे असलेल्या जमीनी पैकी शिवाजी व्यंकट चेंडकापुरे यांच्या हिस्सेत वाटून आलेली जमीन. तसेच दुसरा उडाण तुकडा क्षेत्र 00 हे. 20 आर ज्याची चतु:सीमा पुवेस व्हनाळे यांची जमीन, पश्चिमेस श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे यांच्या हिस्स्यात वाटून दिलेली जमीन दक्षिणेस व 1 ते 13 यांच्या सामाईक नावे असलेल्या जमीनी पैकी शिवाजी व्यंकट चेंडकापुरे यांच्या हिस्सेत वाटून आलेली जमीन, उत्तरेस गुंडप्पा चेंडकापुरे यांची जमीन. तसेच मौजे थोरलीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमीन गट क्र. 22/3 मधील शिवाजी याचे हिस्सेस दोन उडाण तुकड्यात देण्यात आलेले जमीन पहिला तुकडा क्षेत्र 00 हे. 37 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस-दापेगावे यांची जमीन, पश्चिमेस-गल्लीनाथ याच्या हिस्सेस वाटून आलेली सदर गटातील जमीन, दक्षिणेस-गुंडाप्पा यांची जमीन व उत्तरेस-वादी शिवाजी याचे हिस्सेस वाटून देण्यात आलेली जमीन, दुसरा तुकडा क्षेत्र 00 हे. 20 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस- व्हनाळे यांची जमीन, पश्चिमेस श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे याचे हिस्सेस वाटून आलेली जमीन, दक्षिणेस व उत्तरेस सदर गटातील वादी शिवाजी याचे हिस्सेस वाटून आलेली जमीन, येणेप्रमाणे वर नमुद चतुः सिमेतील एकुण जमीन क्षेत्र 1 हे. 14 आर इतकी जमीन वादी शिवाजी व्यंकट चेंडकापूरे यांचे वाटणी हक्क हिस्सेत देण्यात आलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
2. श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे यांच्या हिस्सेस जमीन गट क्र. 22/3 मधील जमीन क्षेत्र 1 हे. 69 आर, पो.ख. 0.02 आर एकुण क्षेत्र 1 हे. 71 आर आकार 3 रू. 74 पैसे पैकी दोन उडाण तुकड्यात जमीन देण्यात आलेली असून त्यापैकी पहिला तुकडा क्षेत्र 00 हे. 20 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस व पश्चिमेस गुंडाप्पा चेंडकापूरे यांची जमीन, दक्षिणेस-जेटप्पा चेंडकापुरे यांची जमीन व उत्तरेस-सदर गटातील मल्लीनाथ यांचे हिस्सेस वाटून आलेली जमीन व तसेच दुसरा तुकडा क्षेत्र 00 हे. 36 आर पो.ख. 0.01 आर एकुण क्षेत्र 00 हे. 37 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस-सदर गटातील वादी शिवाजी यास वाटून आलेली जमीन, पश्चिमेस, दक्षिणेस व उत्तरेस सदर गटातील मल्लीनाथ यांचे हिस्सेस वाटून आलेली जमीन, येणेप्रमाणे वर नमुद चतुः सिमेतील एकुण जमीन क्षेत्र 00 हे. 57 आर इतकी जमीन व तसेच मौजे थोरलीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमीन गट क्र. 18 मधील जमीन क्षेत्र 2 हे. 43 आर, आकार 1 रू. 60 पैसे पैकी पश्चिमेकडील बाजुचे जमीन क्षेत्र 1 हे. 22 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस-प्रतिवादी क्र. 3 व प्रतिवादी क्र. 7 ते 9 यांच्या हिस्सेस वाटून आलेली सदर गटातील जमीन, पश्चिमेस-गोपाळ मारुती खवडे यांची जमीन, दक्षिणेस-शीव रस्ता, उत्तरेस-व्हनाळे यांची जमीन, येणेप्रमाणे वर नमुद चतुः सिमेतील जमीन क्षेत्र 00 हे. 57 आर व क्षेत्र 1 हे. 22 आर इतकी जमीन श्रीमंत लक्ष्मण चेंडकापूरे यांचे वाटणी हक्क हिस्सेत देण्यात आलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
3. बसवराज सिद्राम चेंडकापुरे यांच्या वाटणी हिस्सेस जमीन गट क्र. 18 मधील क्षेत्र 2 हे. 43 आर, आकार 1 रू. 60 पैसे पैकी पुर्व-उत्तर बाजुचे जमीन क्षेत्र 00 हे. 60 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस-गोपाळ मारुती खवडे यांची जमीन, पश्चिमेस सदर गटातील श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे याचे हिस्से वाटून आलेली जमीन, दक्षिणेस-सदर गटातील प्रतिवादी क्र. 7 ते 9 यांचे सामाईक हिस्सेत वाटून आलेली जमीन, उत्तरेस-व्हनाळे यांची जमीन, येणेप्रमाणे वर नमुद चतुः सिमेतील जमीन बसवराज सिद्राम चेंडकापूरे यांचे वाटणी हक्क हिस्सेत देण्यात आलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
4. मल्लीनाथ सिद्राम चेंडकापुरे यांच्या वाटणी हिस्सेस जमीन गट क्र. 22/3 मधील जमीन क्षेत्र 1 हे. 69 आर, पो.ख. 0.02 आर एकुण क्षेत्र 1 हे. 71 आर आकार 3 रू. 74 पैसे पैकी तीन उडाण तुकड्यात त्यापैकी पहिला तुकडा जमीन क्षेत्र 00 हे. 20 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेश- वादी शिवाजी याचे हिस्सेसेस वाटून आलेली सदरगटातील जमीन, पश्चिमेस-गुंडाप्पा चेंडकापुरे यांची जमीन, दक्षिणेस व उत्तरेस-सदर गटातील श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे यांचे हिस्सेसेस वाटून आलेली जमीन, दुसरा तुकडा जमीन क्षेत्र 00 हे. 20 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे याचे हिस्सेसेस वाटून आलेली सदर गटातीलजमीन, पश्चिमेस, दक्षिणेस व उत्तरेस-गुंडाप्पा चेंडकापुरे यांची जमीन, तिसरा तुकडा जमीन क्षेत्र 00 हे. 16 आर + पो.ख. 0.01 आर असे एकूण 00 हे. 17 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस शिवाजी याचे हिस्सेसेस वाटून आलेली सदर गटातील जमीन व गुंडाप्पा चेंडकापुरे यांची जमीन, पश्चिमेस-गुंडाप्पा चेंडकापुरे यांची जमीन, दक्षिणेस-सदर गटातील श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे यांचे हिस्सेसेस वाटून आलेली जमीन, उत्तरेस- मारूती यल्लाप्पा यंपाळे यांची जमीन, येणेप्रमाणे वर नमुद चतुःसिमेतील एकूण जमीन क्षेत्र 00 हे. 57 आर इतकी जमीन मल्लीनाथ सिद्ध्राम चेंडकापुरे यांचे वाटणी हक्क हिस्सेत देण्यात आलेली आहे.
5. उषा रमेश चेंडकापुरे, लक्ष्मण रमेश चेंडकापुरे व रोहन रमेश चेंडकापुरे अ.पा.क. यांच्या सामाईक वाटणी हिस्सेस- मौजे थोरलीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमीन गट क्र. 18 मधील सामाईक नावे असलेले जमीन क्षेत्र 2 हे. 43 आर पैकी पूर्व-दक्षिण बाजूचे जमीन क्षेत्र 00 हे. 61 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस-गोपाळ मारूती खबडे यांची जमीन, पश्चिमेस-सदर गटातील श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे यांचे हिस्से वाटून आलेली जमीन, दक्षिणेस-शीव रस्ता व उत्तरेस-सदर गटातील बसवराज सिद्राम चेंडकापुरे यांचे हिस्सेत वाटून आलेली जमीन. येणेप्रमाणे वर नमुद चतुःसिमेतील जमीन उषा रमेश चेंडकापुरे, लक्ष्मण रमेश चेंडकापुरे व रोहन रमेश चेंडकापुरे अ.पा.क. यांच्या सामाईक वाटणी हक्क हिस्सेत देण्यात आलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
जेटप्पा व्यंकट चेंडकापुरे यांच्या वाटणी हिस्सेस:- मौजे थोरलीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमीन गट क्र. 22/3 मधील सामाईक नावे असलेले जमीन क्षेत्र 00 हे.86 आर, पैकी क्षेत्र 00 हे. 29 आर ज्याची चतुःसिमा पुर्वेस-कोतले यांची जमीन, पश्चिमेस-शिवराम खबडे यांची जमीन, दक्षिणेस-हिप्परगा ते थोरलीवाडी शीव, उत्तरेस-जेटप्पा चेंडकापुरे यांची जमीन, येणेप्रमाणे वर नमुद चतुःसिमेतील जमीन जेटप्पा व्यंकट चेंडकापुरे यांच्या वाटणी हक्क हिस्सेत देण्यात आलेली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
६) हे की रामुबाई रायाप्पा खवडे ही श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे ची विवाहीत बहीण असून ती तिच्या सासरी सुखा-समाधानाने नांदत असल्यामुळे व तसेच श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे हा रामुबाई रायाप्पा खवडे हीस सणावाराला बोलावून योग्य तो मानपान, चोळीकाकण करीत असल्याने रामुबाई रायाप्पा खवडे यांनी वर नमूद विवाद्य मिळकतीतील तिचा कायदेशीर हक्क हिस्सा श्रीमंत लक्ष्मण चेंडकापुरे यांचे हक्कात विनामोबदला कायमचा सोडून दिलेला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. हे की, सुरेखा माधव सास्तुरे व रेखा फुलचंद मंडले या बसवराज सिद्राम चेंडकापुरे व मल्लीनाथ सिद्राम चेंडकापुरे यांच्या विवाहीत बहीण असून ते त्यांच्या सासरी सुखा-समाधानाने नांदत असल्यामुळे व तसेच बसवराज सिद्राम चेंडकापुरे व मल्लीनाथ सिद्राम चेंडकापुरे हे सुरेखा माधव सास्तुरे व रेखा फुलचंद मंडले यांना सणावाराला बोलावून योग्य तो मानपान, चोळीकाकण करीत असल्याने सुरेखा माधव सास्तुरे व रेखा फुलचंद मंडले यांनी वर नमूद विवाद्य मिळकतीतील त्यांचा कायदेशीर हक्क हिस्सा बसवराज सिद्राम चेंडकापुरे व मल्लीनाथ सिद्राम चेंडकापुरे यांचे हक्कात विनामोबदला कायमचा सोडून दिलेला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे
८) हे की, दैवताबाई दशरथ भोसले, संगीता रायाप्पा पाटील या शिवाजी व्यंकट चेंडकापुरे व लिंबाजी व्यंकट चेंडकापुरे व जेटप्पा व्यंकट चेंडकापुरे यांच्या विवाहीत बहीण असून ते त्यांच्या सासरी सुखा-समाधानाने नांदत असल्यामुळे व तसेच शिवाजी व्यंकट चेंडकापुरे व जेटप्पा व्यंकट चेंडकापुरे हे दैवताबाई दशरथ भोसले, संगीता रायाप्पा पाटील यांना सणावाराला बोलावून योग्य तो मानपान, चोळीकाकण करीत असल्याने दैवताबाई दशरथ भोसले, संगीता रायाप्पा पाटील यांनी वर नमूद विवाद्य मिळकतीतील त्यांचा कायदेशीर हक्क हिस्सा शिवाजी व्यंकट चेंडकापुरे व जेटप्पा व्यंकट चेंडकापुरे यांचे हक्कात विनामोबदला कायमचा सोडून दिलेला आहे. तसेच लिंबाजी व्यंकट चेंडकापुरे यांना वर नमूद जमीनीमध्ये हक्क हिस्सा नको असल्यामुळे त्यांनी स्वखुशीने, विनामोबदला त्यांचा कायदेशीर हक्क हिस्सा त्याचे सख्खे भाऊ शिवाजी व्यंकट चेंडकापुरे व जेटप्पा व्यंकट चेंडकापुरे यांचे हक्कात कायमचा सोडून दिलेला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
तरी, मा. न्यायालयाचे आदेशानुसार सातबारास वरील प्रमाणे मालकी हक्काची नोंद होणेसाठी सादर.