Ferfar #2598 · कोथळी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- बेंबळीकर एन. पी.
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
कोर्ट डिग्री तडजोड दि
मे दिवाणी न्यायाधीश साहेब वरीष्ठ स्तर उमरगा यांच्या कोर्टात मौजे कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव येथील दाव्यातील मौजे कोथळी ता. उमरगा येथील जमीन गट नं. 1 मधील अन्नपूर्णा सिद्राम बिराजदार , राजकुमार सिद्राम बिराजदार गुराप्पा सिद्राम बिराजदार, नेहरू सिद्राम बिराजदार यांचे नांवे असलेले जमीन क्षेत्र २ हे. ९९ आर, संपूर्ण क्षेत्राची मिळकत बाबत दाव्याचा विषय आहे या वादग्रस्त जमिनीबाबत आर.सी.एस. क्रमांक 403/२०२६ नि.क्र.9 दिनांक १२/०९/२०२६ नुसार वादी राजकुमार सिद्राम बिराजदार, वय-61वर्ष, धंदा-शेती, रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव प्रतिवादी 1) गुराप्पा सिद्राम बिराजदार, वय-77वर्ष, धंदा-शेती, रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव 2) नेहरू सिद्राम बिराजदार, वय 75 वर्ष, धंदा-शेती, रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव 3) शिवानंद यशवंत बिराजदार, वय-74वर्ष, धंदा शेती, रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव 4) अशोक यशवंत बिराजदार, वय-73 वर्ष, धंदा-शेती, रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव वादी व प्रतिवादी क्र. 1, 2 हे आपसात सख्खे भाऊ असून प्रतिवादी क्र. 3 व 4 हे वादी व प्रतिवादी क्र. 1, 2 यांचे चुलत भाऊ आहेत. वादी, प्रतिवादी क्र. 1, 2 चे वडील नामे सिद्राम कल्याणी बिराजदार हे सन 2004 साली मयत झाले असून वादी व प्रतिवादी क्र. 1,व 2 यांची आई नामे अन्नपूर्णा सिद्राम बिराजदार ही दिनांक 02/06/2022 रोजी मयत झालेली असून सदर मयताचे पश्चात वादी व प्रतिवादी क्र. 1 व 2 हेच त्यांचे कायदेशीर वारस व हक्कदार असून वादी व प्रतिवादी क्र. 1, 2 हे हिंदु एकत्र कुटुंबाचे अविभाज्य घटक आहेत. सदर गटात असलेल्या जुन्या विहीरीतील व चिंच झाडे यात वादी व प्रतिवादी क्र. 1, 2 यांचे वडील सिद्राम कल्याणी यांचा 8 आणे हिस्सा असून सदर 8 आणे पाण्याच्या हिस्स्यामध्ये वादी व प्रतिवादी क्र.१ व २ यांचा यांचा सामाईक हक्क हिस्सा आहे तसेच प्रतिवादी क्र. 3 व 4 यांचा प्रत्येकी चार आणे हिस्सा आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे सदरहू विवाद्य मिळकतीचे 7/12 उताऱ्यावर जनावराच्या गोठ्यासाठी ००.०४ आर प्रतिवादी क्र. 3 व 4 यांच्या नावाची नोंद इतर अधिकार रकान्यात असून सदरची नोंद 7/12 उताऱ्यावरून कमी करण्यास प्रतिवादी क्र. 3 व 4 यांची पुर्णतः संमती असून कसल्याही प्रकारची हरकत वा तक्रार राहणार नाही हे वादी प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. वादी व प्रतिवादी यांच्यात मौजे कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमिनीबाबत पुढीलप्रमाणे तडजोड केली आहे.अ.क्र. 1) राजकुमार सिद्राम बिराजदार ग.नं. १ क्षेत्र १ हे.०१ आर अ.क्र. २) गुराप्पा सिद्राम बिराजदार ग.नं. १ क्षेत्र १ हे.०५ आर अ.क्र. ३) नेहरू सिद्राम बिराजदार ग.नं. 1 क्षेत्र 00हे.९३ आर
वरील तडजोडी प्रमाणे वादी प्रतिवादी यांच्यात तडजोड होऊन त्यास प्रतिवादी यांनी मान्यता दिली आहे. तरी अर्ज व कोर्ट डिग्री आधारे सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.