Ferfar #6350 · शिरापूर (सोलापूर)
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1/ड
- Talathi
- विशाल सौदागर कांबळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : kra./jama-1/kavi/702/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
मा. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन शाखा क्रमांक ७, मोहोळ, सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक २०२६/उभूसक्र-७/मोहोळ/संकीर्ण-१/एस.आर.-१२/९१/कावी-८१८, दिनांक १९/०८/२०२६ अन्वये मौजे शिरपूर येथील जमीन गट क्रमांक ४९/१/ड (जुना सर्वे क्रमांक ४९/१/४) पैकी क्षेत्र ०.२६ हेक्टर, पोटखराब क्षेत्र शून्य इतके क्षेत्र एस.आर. क्रमांक १२/९१, दिनांक १९/१२/१९९४ अन्वये भूसंपादन अधिनियम, १८९४ अंतर्गत संपादित करण्यात आले असून, सदर संपादनाबाबत अंतिम निवाडा जाहीर करण्यात आलेला आहे. सदर भूसंपादनाच्या अनुषंगाने संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संपादनासंबंधी नोंद घेण्यात आलेली आहे.
तसेच, मा. तहसीलदार, मोहोळ यांचेकडील पत्र क्रमांक जमा-१/कावी-७०२/२०२६ अन्वये प्राप्त आदेशाच्या अनुषंगाने वरील जमिनीच्या अधिकार अभिलेखात कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे क्र.2 सोलापूर अशी नोंद करण्यात आली