Ferfar #6354 · वाटंबरे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 440
- Talathi
- भारत पांडुरंग डांगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमाबंदी/ पोटखराब /एस आर/11/ 2026
आदेश दिनांक : 21/08/2026
ज्याअर्थी, राज्यातील ब-याच शेतक-यांनी पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र सुधारणा करुन लागवडीयोग्य केलेले आहेत. त्या क्षेत्राच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये न घेतल्यामुळे शेतक-यांना पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गीक आपत्तीत पिकांचे होणा-या नुकसानीचा मोबदला इ. मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पिकाखाली असलेले पोटखराब क्षेत्रातील शेती उत्पादनाचा नियोजनाचे कामात विचार केला जात नाही. यापुर्वी पोटखराब म्हणून नोंद असलेले क्षेत्र धारकास लागवडीखाली आणता येत होते. परंतु त्यावर महसुलाची आकारणी करता येत नव्हती आता शासनाकडील दिनांक 29/08/2018 रोजीचे अधिसुचनेव्दारे महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) सुधारणा नियम, 2018 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 च्या नियम 2 चा पोट-नियम (2) मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्याअन्वये धारकाने पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यास, त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे, त्याकरीता अतिरीक्त आकारणी करण्यात येईल अशी तरतुद करण्यात आली आहे.
ज्याअर्थी, मंडळ अधिकारी सोनंद व ग्राम महसुल अधिकारी वाटंबरे यांनी मौजे वाटंबरे ता. सांगोला जि. सोलापूर येथील गट नंबर 440 चा खाते नंबर 5137,5233,5234 चे पोटखराब वर्ग अ दर्जाचे क्षेत्र 0.23 हे.आर इतके क्षेत्र लागवडीखाली आणलेबाबत दिनांक 15-04-2025 रोजीच्या परिशिष्ट 1अ व परिशिष्ट 1ब चे अहवालात नमुद केलेले आहे. तसेच ग्राम महसुल अधिकारी वाटंबरे यांनी सदर लागवडीखाली आणलेल्या क्षेत्रामध्य मका या पिकाची लागवड केली असलेबाबत परिशिष्ट -3 च्या अहवालात नमुद केलेले आहे.
ज्याअर्थी, मंडळ अधिकारी सोनंद यांचेकडील परिशिष्ट 5 अन्वये सदर क्षेत्र लागवडीखाली आणलेने अतिरिक्त आकारणी लागू करणेस हरकत नसलेबाबत अहवाल इकडील कार्यालयास सादर केला आहे. तसेच इकडील कार्यालयीन स्तरावरुन याबाबत परिशिष्ट -6 अन्वये अहवाल उपअधिक्षक, भुमि अभिलेख कार्यालय सांगोला यांना प्रपत्र अ मध्ये पाठविणेत येऊन सदर गट नंबरच्या मुळ वर्गीकरण नकाशा (सर्व्हे नंबर, गाव नकाशा, प्रतीबुक, फाळणीबुक, मोजणीबुक इ.) अभिलेखावरुन गाव नमुना नंबर 7/12 वर दर्शविलेले पोटखराब वर्ग (अ) क्षेत्राबाबत खात्री करावी, जरुर तर स्थळपाहणी करावी. तसेच आवश्यक त्या सर्व अभिलेखाच्या नक्कल प्रतीसह दुरुस्त आकारणी ठरवून पाठविणेस सुचित करणेत आलेले आहे.
ज्याअर्थी, उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय सांगोला यांचेकडील वाचले क्रमांक 05 अनुसार दुरुस्त आकारीणीचा तपशील इकडील कार्यालयास प्रपत्र अ मध्ये सादर करणेत आलेला आहे. सदर प्रकरणात जमीन धारकांचे जबाब, पंचनामा त्यासोबतची कागदपत्रे स्थळपाहणी अहवाल यावरुन मौजे वाटंबरे येथील गट नंबर 440 चा खाते नंबर 5137,5233,5234 चे पोटखराब वर्ग (अ) दर्जाचे क्षेत्र 0.23 हे. आर इतके क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणलेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदर क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्याच्या निष्कर्षाप्रत मी आले आहे.
त्याअर्थी मी तहसिलदार सांगोला मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालीलप्रमाणे नमुद केलेल्या प्रपत्र ब यादीमधील पोटखराब वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समावेश करुन सदर क्षेत्राची गट नंबर मधील सद्यस्थितीतील एकुण लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात प्रपत्र ब मध्ये नमुद केल्याप्रमाणे अतिरीक्त आकारणी करण्यास मान्यता देत आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करणेत यावी.