सातबारा Watch

← जावली

Ferfar #3016 · जावली

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
389
Talathi
वाल्मिक शंकरराव भताने
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील पत्र क्रमांक क्र. कुका /कावि-३४९/२६ दि.३१/०८/२०२६ लगत मंडल अधिकारी बरड यांचा जा.क्र. २२४/२६, दि.१०/०८/२०२६ रोजीचा अहवाल आलेवरून मौजे जावली ता.फलटण येथील जमीन मिळकत गट नं. ३८९ चे इतर हक्कातील बाबुराव शिवराम हुबे, जयसिंग रघुनाथ हुंबे व बचाराम शिवराम हुबे यांच्यावारसांची नांवे कमी करणेबाबत उक्त संदर्भीय अर्ज तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेला आहे. त्याअनुषंगाने मौजे जावली ता.फलटण येथील गट नं. ३८९ मधील क्षेत्र श्री.शंभु महादेव देवस्थान या देवस्थानचे असुन आण्णा श्रीपती पवार (घडशी) व इतर यांना वहिवाटीस देण्यात आलेल्या होत्या.त्यानंतर त्यांच्या वारसांनी सदरच्या जमीन मधील क्षेत्र बचाराम शिवराम हुबे, जयसिंग हुंबे व बाबुराव हुंबे यांना वहिवाटीस दिल्या. फेरफार नं. ७७४ ने बचाराम शिवराम हुंबे यांनी मौजे जावली येथील गट नं.३८९ मधील त्यांच्या हिश्याचे क्षेत्र जयश्री जयसिंगराव पवार यांना खंडाने भाडेपट्टा करुन दिला व फेरफार नं.७७५ ने बचाराम शिवराम हुंबे यांनी मौजे जावली येथील गट नं.३८९ मधील त्यांच्या हिश्याचे उर्वरित क्षेत्र सुनिल जयसिंगराव पवार व मल्हारी रामचंद्र बाबर यांना खंडाने भाडेपट्टा करुन दिला. मा.उपविभागीय अधिकारी सो फलटण यांचेकडील आदेश क्र.वतन फेरचौकशी/१३/२०११, दि.१२/११/२०१८ व क्र.वतन फेरचौकशी /२२/२०११, दि.१२/११/२०१८ नुसार फेरफार नं.७७४ व ७७५ ने बचाराम शिवराम हुंबे यांनी जयश्री जयसिंगराव पवार, सुनिल जयसिंगराव पवार व मल्हारी रामचंद्र बाबर यांना करुन देण्यात आलेला भाडेपट्टा फेरफार नं. १९९४ व १९९५ ने भाडेपट्टा रद्द करून त्यांची इतर हक्कांतील नांवे कमी करण्यात आली. सदर प्रकरणाची मंडल अधिकारी बरड यांचेमार्फत चौकशी केलेली असुन पुढीलप्रमाणे अहवाल देण्यात आलेला आहे.मौजे जावली ता.फलटण येथील गट नं.३८९ मधील फेरफार नं.१८२४. दि.०२/०९/२०१७ रोजीच्या फेरफार नुसार इतर हक्कांतील जयसिंग रघुनाथ हुबे,बाबूराव शिवराम हुबेव बचाराम हुंबे यांची पुन्हा वारस नोंद होवून जयसिंग हुवे यांचे वारस म्हणून मालन जयसिंग हुबे, बाबुराव शिवराम हुबे यांचे वारस म्हणून जालिंदर बाबुराव हुबे, बाळासो बाबुराव हुबे, अलका महादेव पवार, प्रभावती शिवाजी पवार, भागुबाई दत्तू जाधव व सिंधूबाई तात्यावा पवार व बचाराम शिवराम हुबे यांचे वारस पुष्पा तानाजी चव्हाण, विलास बचाराम हुबे,शोभा निळकंठ कदम, लालासो बचाराम हुंबे व सजाबाई बचाराम हुबे यांचे वारसांची नोंद इतर हक्कांत दाखल झाले असून त्यांची नांचे कमी करणेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ प्रमाणे ग्राम महसुल अधिकारी जावली यांना आदेश देण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे. तरी मौजे जावली ता.फलटण येथील गट नं. ३८९ मधील इतर हक्कांत मुळ जयसिंग हुंबे यांचे वारस म्हणून मालन जयसिंग हुंबे, बाबुराव शिवराम हुंबे यांचे वारस म्हणून जालिंदर बाबुराव हुबे, बाळासो बाबुराव हुबे, अलका महादेव पवार,प्रभावती शिवाजी पवार, भागुबाई दत्तू जाधव, सिंधूबाई तात्याबा पवार व बचाराम शिवराम हुंबे यांचे वारस पुष्पा तानाजी चव्हाण,विलास बचाराम हुंबे,शोभा निळकंठ कदम,लालासो बचाराम हुंबे व सजाबाई बचाराम हुवे यांची नांवे कमी केली मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील पत्र क्रमांक क्र. कुका /कावि-३४९/२६ दि.३१/०८/२०२६ लगत मंडल अधिकारी बरड यांचा जा.क्र. २२४/२६, दि.१०/०८/२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.