Ferfar #9926 · पाल
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- रोहीणी बाळासाहेब शिवपुजे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
ज्याअर्थी अर्जदार श्री. जयसिंग मुगुटराव चंदुगडे, रा. धावरवाडी, ता. कराड जि. सातारा यांनी त्यांचे मालकीचे मौजे पाल, ता. कराड येथील गट नंबर 181 क्षेत्र 0.27 हे. आर, आकार 03 रु. 94 पैसे संपूर्ण हिस्सा या जमिनीची कुळकायदा कलम 43 प्रमाण नवोन अविभाज्य शतं कना करून मिळणेसाठी दिनांक 18/03/2024, 23/05/2025 रोजी विनंती अर्ज या कार्यालयाकडे सादर केला आहे.
ज्याअर्थी अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसिलदार कराड यांना चौकशी करून संबंधितांचे जाब-जबाबासह अहवाल सादर करणेबाबत इकडील पत्र क्र. कुळकायदा/कावि/08/24 दिनांक 10/04/2024 अन्वये कळविणेत आलेले होते. त्याप्रमाणे तहसिलदार कराड यांनी मंडल अधिकारी इंदोली यांचेमार्फत सदर अर्जाची चौकशी करून घेवून अर्जदार यांचा जबाब व आवश्यक कागदपत्रांसह त्यांचेकडील पत्र क्रं. आरटीएस केसेस/कावि/662/2024 दिनांक 26/06/2024 अन्वये अहवाल या कार्यालयास सादर केला आहे.
ज्याअर्थी मौजे पाल ता. कराड येथील गट नंबर 181 क्षेत्र 0.27 हे.आर, आकार 03 रु. 94 पैसे संपूर्ण हिस्सा ही जमीन मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 चे कलम 3 याच्या उपबंधान्वये कुळ श्री. जयसिंग मुगुटराव चंदुगडे यांस मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 चे कलम 32 ग अन्वये खरेदीची किंमत ठरवून 32 एम प्रमाणपत्रानुसार त्यांनी खरेदी दस्त क्रमांक 2005/2023 दिनांक 06/12/2023 रोजी मा. तहसिलदार सो. तथा शेतजमीन न्यायाधिकरण कराड यांचेकडून श्री. जयसिंग मुगुटराव चंदुगडे यांनी खरेदी केली आहे. त्याचा अंमल गावी फेरफार नंबर 8915 दिनांक 04/01/2023 अन्वये 7/12 सदरी कब्जेदार म्हणून त्यांचे नावाची नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना ही जमीन कुळकायदा 32एम ने विक्री होवून कुळकायदा कलम 43 अन्वये नवीन शर्तीने मिळालेली आहे. तसेच अर्जदार यांनी रक्कम रु.100/ चे स्टॅम्प पेपरवर तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कराड यांचेसमोर केलेले दिनांक 14/06/2024 रोजीचे प्रतिज्ञापत्र / शपथपत्र प्रकरणी सामील केले आहे.
ज्याअर्थी मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 व नियम 25 तसेच शासन परिपत्रक क्रं. टीएनसी-04/2013/प्र.क्र. 196/ज-1 दि.07/05/2014 अन्वये अर्जदार यांनी मौजे पाल, ता. कराड येथील गट नंबर
181 क्षेत्र 0.27 हे. आर, आकार 03 रु. 94 पैसे या संपूर्ण क्षेत्राची आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम शासनजमा करून चलनाची प्रत प्रकरणी सामील केली आहे.
त्याअर्थी मी उपविभागीय अधिकारी कराड उपविभाग कराड, मला मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 व नियम 25 (अ) (ई) (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, मौजे पाल, ता. कराड येथील खातेदार श्री. जयसिंग मुगुटराव चंदुगडे यांची मिळकत मौजे पाल ता. कराड गट नंबर 181 क्षेत्र 0.27 हे. आर, आकार 03 रु. 94 पैसे या संपूर्ण क्षेत्राचे 7/12 सदरी इतर हक्कात असलेला कु.का.क. 43 प्रमाणे नवीन शर्तीवर असा दाखल असलेला शेरा खालील नमूद अटी व शर्तीवर कमी करून भोगवटादार वर्ग-2 चा भोगवटादार वर्ग-1 करणेबाबत आदेश देत आहे.
अटी व शर्ती
1) सदर जमिनीचा वापर हा शेतीसाठीच करणेचा आहे.
2) मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व एकत्रिकरण कायदा 1948 च्या तरतुदी बंधनकारक राहतील.
3) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल मर्यादा क्षेत्रापेक्षा जास्त जमीन धारण कायदा बंधनकारक राहील.
4) सदर मिळकतीबाबत भविष्यामध्ये कोणताही वाद अथवा न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी खरेदी देणार यांची राहील.
5) सदर जमिन विक्री करणेकामी इतर कायद्यातील तरतुदीच्या परवानगीची आवश्यकता असेल तर
त्याबाबत संबंधित सक्षम अधिका-याकडून परवानगी घेणेची आहे.
6) इतर हक्कातील बँक/सोसायटी/पतसंस्था बोजा जमीन हस्तांतरणां पूर्वी भागविणेचा आहे.
7) या आदेशान्वये फक्त कुळकायदा कलम 43 ची शर्त कमी करण्यात येत आहे. सदरचा आदेश इतर
कायद्यान्वये लागु असलेल्या नवीन शर्तीस लागू नाही.
प्रकरणी चुकीची व अपुरी माहिती सादर केली असल्यास व वरील पैकी कोणत्याही अटीचा भंग झालेस
परवानगी रद्द समजणेत येईल व हस्तांतरीत क्षेत्र सरकार जमा करणेत येईल.