Ferfar #9930 · पाल
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 286
- Talathi
- रोहीणी बाळासाहेब शिवपुजे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 10/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
ज्याअर्थी अर्जदार श्री. प्रतापराव उर्फ युवराज इंजोजीराव पाटील व इतर रा.पाल ता. कराड जि.सातारा यांनी मौजे पाल येथील भूमापन क्र. २८६ या शेतजमिनीचे विभाजन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ कलम ८५ अन्वये करणेबाबत या कार्यालयात अर्ज सादर केला होता.
त्याअर्थी महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ नियम ३ अन्वये नमुना ३ मध्ये सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ नमुना ३ अन्वये नमुना ब मध्ये उदघोषणा प्रसिध्द करण्यात आली होती. आणि ज्याअर्थी, उपरोक्त चौकशीमध्ये खालील बाबतीत खात्री करण्यात आली आहे.
1. सदर मिळकत ही अर्जदारांची वडिलोपार्जित मिळकत आहे.
2. सदर वाटपास सर्व सहधारकांची संमती आहे. सदर वाटपाबाबत कोणाचीही हरकत नाही.
3. सदरचे वाटप हे सरस-निरस वहिवाटीप्रमाणे आहे.
4. प्रस्तुत वाटपामुळे मुंबईच्या जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण
करण्याबाबत अधिनियम 1947 च्या तरतुदींचा भंग झालेला नाही.
5. प्रस्तुत विभाजन कोणत्याही कायद्यातुन पळवाट काढण्यासाठी करण्यात आलेले नाही.
6. सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाही.
7. सदर विभाजनामुळे अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायदयाचा भंग होत नाही.
8. सदर मिळकतीबाबत कोणत्या-ही न्यायालयात कोणताही वाद/दावा प्रलंबित नाही किंवा मनाई हुकूम नाही.
ज्याअर्थी, वरील प्रमाणे प्रस्तुत प्रकरणी चौकशीचे कामकाज पुर्ण करुन सदरचे विभाजन हे नियमानुसार योग्य व बरोबर आहे याबाबत माझी पूर्ण खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी तहसिलदार कराड ता. कराड जि. सातारा मला प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार अधिकाराचा वापर करुन खालील तक्त्यामध्ये दर्शविलेल्या मौजे पाल येथील भूमापन क्र. २८६ वरील जमिनीचे वाटप करणेस खालील वाटप तक्त्यानुसार परवानगी देत आहे.युवराज इंजोजीराव पाटील ३.११ १)विराज प्रतापराव पाटील १.५६.००
२) अभिजीत प्रतापराव पाटील १.५५.०० वरीलप्रमाणे मौजे पाल येथील भूमापन क्र. २८६ वरील जमिनीचे वाटप करणेस खालील अटी व शर्तीनुसार परवानगी देत आहे.
अटी व शर्ती
1. सदरचे वाटणीपत्र अर्जदार यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे देणेत आलेले आहे.
2. अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राबाबत भविष्यात काही वाद निर्माण झालेस त्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील
3. सदर आदेशाबाबत आपआपसांत अथवा लगतच्या खातेदारासंह कोणताही वाद अथवा तंटा निर्माण झालेस अथवा न्यायालयीन बाब उदभवलेस सदरचा आदेश रद्द समजणेत येईल.
4. सदरचे वाटणीपत्र हे अर्जदार यांनी सादर केलेल्या दिनांक २२/०५/२०२५ रोजीच्या र.र.५००/- चे स्टॅम्प पेपरवर नमुद केले प्रमाणे मान्यता देणेत आलेली आहे. सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही वाद उदभवलेस सदरचे वाटणीपत्र हे रदद समजणेत येईल.
5. वाटणीपत्र दिलेल्या गटाच्या ७/१२ उता-यावर अर्जदार यांचे व्यतिरिक्त सहहिस्सेदार दिसुन येत असुन भविष्यात सदर वाटणीपत्राच्या क्षेत्राबाबत वाद निर्माण झालेस त्याचे निराकरण करणे अर्जदार यांचेवर बंधणकारक राहील या बाबत कोणतीही न्यायालयीन बाब उदभवलेस सदरचे वाटणीपत्र हे रदद समजणेत येईल.
6. राज्य शासन महसुल देणा-या धारण जमिनीचे विभाजन करतांना योग्य रितीने झालेला खर्च, महसुल अधिका-यास योग्य वाटेल अशा प्रमाणात, ज्यांच्या विनंतीवरुन विभाजन करण्यात आले अशा सहधारकांकडुन किंवा विभाजनात ज्यांचा हितसंबध असेल अशा व्यक्तिच्या हिश्यामधून महसुलाची मागणी असल्याप्रमाणे वसुल करण्यात येईल.
7. वरील अटी व शर्ती मान्य असलेबाबत अर्जदार यांनी र.रु.५००/- चे स्टॅम्प पेपरवर तहसिलदार कराड यांचेकडे आदेश मिळालेच्या 1 महिन्याचे आत सादर करणे आवश्यक आहे
8. विभाजनातील शेतजमिनीच्या मूळ अटी व शर्तीना बाधा पोहोचता कामा नये.
9. सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज काढले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहील.
10. सदर वाटप करताना कोणतीही बाब जाणून बुजून लपविल्याचे उघड झाल्यास हा आदेश रद्द करण्यात येईल.
11. अर्जदार यांनी सादर केलेल्या वाटणीपत्राप्रमाणे दिलेल्या चतुःसिमा चुकीच्या असलेस अथवा दुरुस्त करणेचे असलेस सदर आदेशाचा अंमल देण्यात येऊ नये.