Ferfar #1805 · थोरातमळा
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/3
- Talathi
- अमोल साहेबराव महापुरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
फेरफार प्रकार: शर्तभंग नियमानुकूल करून सत्ताप्रकार बदलणे व शेरा कमी करणे.
गट क्रमांक: १४/३ (मौजे थोरातमाळा शेरे, ता. कराड)
संबंधित खातेदार: श्री. सूर्यकांत पांडुरंग कोळेकर, श्री. जयवंत पांडुरंग कोळेकर आणि श्री. गजानन पांडुरंग कोळेकर.
नोंदीचा सविस्तर मायना:
"तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण, कराड यांचे आदेश क्र. टेनन्सी/८४क/एसआर/०६/२०२६, दिनांक २९/१०/२०२६ अन्वये प्राप्त आदेशानुसार मौजे थोरातमाळा शेरे, ता. कराड येथील गट नंबर १४/३ (क्षेत्र ० हे. ३६ आर, पो.ख. ०.०० आर, आकार ४ रुपये ८१ पैसे) या मिळकतीवरील श्री. सूर्यकांत पांडुरंग कोळेकर, श्री. जयवंत पांडुरंग कोळेकर आणि श्री. गजानन पांडुरंग कोळेकर यांच्या सामाईक क्षेत्राचा फेरफार क्रमांक ८४७० (दिनांक १९/०१/१९७२) अन्वये झालेला खरेदी व्यवहार विधीग्राह्य घोषित करण्यात आला आहे.
सदर जमिनीच्या शर्तभंगाची ५०% रक्कम (नजराणा) रुपये ३,९०,६००/- (अक्षरी तीन लाख नव्वद हजार सहाशे रुपये फक्त) खातेदारांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा कराड येथे (GRN MH011869760) दिनांक १३/१०/२०२६ रोजी चलनाव्दारे शासन जमा केली आहे.
तरी सदर प्राप्त आदेशानुसार, गट नंबर १४/३ च्या ७/१२ उताऱ्यावर खालीलप्रमाणे बदल घेण्यात येत आहेत:
१) ७/१२ च्या इतर हक्क रकान्यात नोंद असलेला "कुळ कायदा कलम ४३ नियंत्रित सत्ता प्रकार" हा शेरा कायमस्वरूपी कमी करण्यात येत आहे.
२) सदर मिळकतीचा सत्ताप्रकार "भोगवटादार वर्ग २" वरून बदलून तो "भोगवटादार वर्ग १" असा करण्यात येत आहे.
आदेशाची प्रत दप्तरी दाखल केली."