Ferfar #46754 · कराड
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/4
- Talathi
- सचिन वसंत निकम
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/अ/368/२०२५
आदेश दिनांक : 12/06/2026
मौजे कराड ता. कराड येथील गट नं. 31/4 यामधील मिळकती संदर्भात मंडल अधिकारी कराड यांनी फेरफार नं. 45083 मध्ये दि. 09/04/2025 रोजी दिलेल्या निर्णयावर नाराज होवून अपिलार्थी यांनी दि. 21/08/2025 रोजी इकडे अपिल दाखल केले आहे. अपिल विलंबाने दाखल केले आहे.
2
प्रस्तुत अपिलाच्या सुनावणी कामी अपिलार्थी व उत्तरार्थी यांना रितसर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उत्तरार्थी यांनी अपिलार्थी यांचे अपील अर्जास म्हणणे सादर केलेले आहे. अपिलार्थी यांनी लेखी म्हणणे / युक्तीवाद सादर केलेला नाही, त्यामुळे अपील हेच त्यांचे म्हणणे ग्राह्य धरणेत येत आहे.
अपिलार्थी यांनी सदर फेरफावर 4 महिने विलंबाने अपील दाखल केलेले आहे. अपिलार्थी यांनी दाखल केलेला विलंबमाफीचा अर्ज पाहता सदरचा विलंब क्षमापित होणेस पात्र आहे. सबब सदरचा विलंब क्षमापित करणेत येत आहे.
टी.डी.आर. खरेदीपत्राचा दस्त क्रमांक 1203/2025 अन्वये दिनकर पांडुरंग शिंदे यांनी मौजे कराड येथील दावा जमीन गट नंबर 31/4 मधील त्यांचे हिस्स्याचा टी डी आर क्षेत्र 270.42 चौ.मी. इतके अपिलार्थी सादिक कादर पठाण यांना विक्री केलेला आहे. सदर व्यवहाराची नोंद फेरफार नंबर 45083 ने धरलेली आहे व मंजूरही करणेत आलेली आहे. सदरचा दस्त हा नगरपालीका कराड यांचेकडून मिळालेल्या टी डी आर हक्काचे हस्तांतरणाचा असलेमुळे सदर दस्ताची नोंद गाव दप्तरी घेता येणार नाही, त्यामुळे सदर व्यवहाराच्या नोंदीचा फेरफार नंबर 45083 रद्द करणेची अपिलार्थी यांनी अपील अर्जामध्ये मागणी केलेली आहे.
यावरुन सदर प्रकरणातील दस्त पाहता त्यामध्ये "AGREEMENT FOR TRANSFER OF DEVELOPMENT RIGHT (TDR)" असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तसेच दस्तासोबत मुख्याधिकारी नगरपालीका कराड यांचा टी.डी.आर. हस्तांतरणास हरकत नसलेबाबतचा दाखला सामिल आहे. अपिलार्थी यांचे मागणीमध्ये तथ्य असलेचे दिसून येत आहे. सबब उक्त दस्त हा केवळ टी.डी.आर. चा हक्क हस्तांतरणाचा असलेमुळे त्याची नोंद गाव दप्तरी घेणे योग्य नाही. त्यामुळे सदर व्यवहाराच्या नोंदीचा फेरफार नंबर 45083 रद्द होणेस पात्र आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता मी, उपविभागीय अधिकारी कराड, उपविभाग कराड या अपील प्रकरणी खालील प्रमाणे आदेश देत आहे.