सातबारा Watch

← अडखळवण

Ferfar #536 · अडखळवण

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/43, 69/11, 69/5
Talathi
रजत संभाजी देसाई
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मा. तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्र. क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे 1/एस.आर-218/2026 दिनांक-30/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने बाजूस दाखल केलेल्या मिळकती सर्वे नं. 22/43 ,69/5 ,69/11__ या दाखल असून सदर मिळकती त्यांना कुळ कायद्याने प्राप्त झालेली आहे. सदर मिळकती ही कुळ कायदा ने प्राप्त असून महसूल व वन विभाग यांजकडील संदर्भिय शासन निर्णयानुसार कुळाच्या जमिनीला 10 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम आकारण्यात येऊ नये असे स्पष्ट नमूद केले आहे. तसेच महसूल व वन विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक. 11 फेब्रुवारी 2014 व महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक. 15 एप्रिल 2026 व शासन क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) अन्वये नि.स.प्र शेरा कमी करण्यासाठी व भूधारणा प्रकार वर्ग २ बदलून वर्ग १ करणे साठी नोंद केली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.