Ferfar #4806 · विसापूर
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/1
- Talathi
- अनिल संपत्ती वगरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक- क्रमांक/आरटीएस/एसआर-187/2026 दिनांक -15/5/2026, अन्वये नजराणा फी पावती क्र.424297 दि. - रक्कम रुपये 234/- (दोनशे चौतीस रुपये ) अन्वये अर्जदार श्री. पांडुरंग रामचंद्र गणवे राहणार विसापूर ता. दापोली जि. रत्नागिरी यात नमूद केले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. = 119/1, 61/28 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म फेरफार क्र 3626 दि – 11/10/75 अन्वये पांडुरंग रामचंद्र गणवे हे कुळ ठरलेले आहेत. आणि कुळ हक्क मान्य होऊन कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस10 वर्षे पूर्ण झालेले आहेत. तसेच अर्जदार यांनी पावती क्र 424297 दि - अन्वये जमीन आकारणी चे चाळीस पट नजराणा रक्कम रुपये 234/- (दोनशे चौतीस रुपये ) रक्कम शासन खाती जमा केली आहे.
महसुल व वनविभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-१ दिनांक 11 फेबुवारी 2014 मधील सुचनेनुसार वर नमूद जमिनीच्या 7/12 मधील नियंत्रीत सत्ताप्रकारची नोंद काढून भू-धारणा पद्धती वर्ग 1 करणे कामी नोंद केली.
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मा.तहसीलदार सो.दापोली यांच्या उक्त आदेशाप्रमाणे भूधारणा वर्ग-2 चे वर्ग-1 करणेकामी नोंद केली.