सातबारा Watch

← चोरवणे

Ferfar #553 · चोरवणे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
125, 67, 68, 69, 84, 85/3, 88
Talathi
सुदिल शामराव कांबळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक परिपत्रक क्रमांक/जबाबी-2/शा.ज.ए.सु./2022 दिनांक 15/03/2022 नुसार गाव नमुना एक ब मध्ये नमूद असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद करणेकामी आदेश प्राप्त झाले होते परंतु,नजरचुकीने एक ब ला नोंद असूनही नोंद करण्याचे तत्कालीन तलाठी यांचेकडून राहिल्याने व Land bank च्या अनुषंगाने मा. तहसिलदार सो खेड यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026 दिनांक 28/10/2026 अन्वये सर्व्हे नं 88/0,67/0,68/0,69/0,85/3,84/0 व 125/0 ची भूधारणा सरकार व कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन करणेकामी नोंद केली. वरील दाखल गट / सर्व्हे नंबर ची भूधारणा सरकार असून सदर जमीन मिळकत ठराविक अटीवर सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत.त्यामुळे मा.तहसीलदार खेड यांजकडील परिपत्रक क्रमांक/जबाबी-2/शा.ज.ए.सु./2022 दिनांक 15/03/2022 अन्वये कबजेदार सदरी महाराष्ट्र शासन करणेकामी व इतर अधिकारात सदर जमीन मिळकती ज्या सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत तो वापर(उदा.रस्ता,पाणंद,मसणवटा,गोवंड, गावठाण, साकव,वहाळ, चावडी, गुरचरण,सरकारी गोडावुन इ.) नमूद करणेकामी नोंद केली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.