सातबारा Watch

← वालोपे

Ferfar #2060 · वालोपे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
608
Talathi
किर्ती अमित पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस नमूद केलेली मिळकत ही आज रोजी फैज इब्राहिम तरे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीला कुळ म्हणून पूर्वीचे खातेदार रत्नू पवार यांचे नावे दाखल होती. ते मयत झालेनंतर सदर मिळकतीला सखाराम रत्नू पवार यांचे एकूण कुटुंब प्रमुख म्हणून दाखल झाले. ते मयत झालेनंतर सदर मिळकतीला सखाराम रत्नू पवार यांचे वारस एकूण कुटुंब प्रमुख म्हणून फेरफार क्रमांक 1910 अ, दिनांक 19/02/1975 ने महादेव सखाराम पोवार यांचे नाव दाखल झाले. परंतु रत्नू पवार यांना सखाराम रत्नू पवार, धोंडू रत्नू पवार हरी रत्नू पवार आणि भागोजी रत्नू पवार हे वारस होते. त्यापैकी आज रोजी सखाराम रत्नू पवार यांचे वारस महादेव सखाराम पवार यांचे तसेच , धोंडू रत्नू पवार हरी रत्नू पवार यांच्या वारसांची नावे 7/12 सदरी दाखल असल्याचे दिसून येत आहे. परंतु महादेव सखाराम पवार वगैरे 14 यांचे बरोबर सदर मिळकतीचे सहहिस्सेदार असलेबाबत भागोजी रत्नू पवार यांचे वारस अर्जदार आत्माराम नारायण पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. भागोजी रत्नू पवार यांचा मुलगा नारायण भागोजी पवार हे मयत असून, नारायण भागोजी पवार यांच्या पत्नी भागी नारायण पवार याही मयत आहेत. त्यांचे आत्माराम नारायण पवार (मुलगा), शेवंती धोंडू खसासे (मुलगी), गंगा लक्ष्मण शिगवण (मुलगी) हे वारस असून सदर नावे 7/12 सदरी दाखल करणेकरिता अर्जदार आत्माराम नारायण पवार यांनी अर्ज 7/12, 8 अ, फेरफार तसेच मा. कार्यकारी दंडाधिकारी खेर्डी यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र क्र. 1299 /2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरून सहहिस्सेदार यांची नावे दाखल केली.