सातबारा Watch

← झरेवाडी

Ferfar #2238 · झरेवाडी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/12
Talathi
सौरभ मोहनराव जाधव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 फेरफार प्रकार: इतर अधिकार / कुळ कायदा कलम ३२(म) खरेदी प्रमाणपत्र गावाचे नाव: मौजे झरेवाडी, तालुका: रत्नागिरी संबधित भूमापन क्रमांक: सर्व्हे नं. २/१२ (क्षेत्र ०.२७.०० हे.आर., आकार ०.१२) मौजे झरेवाडी, ता. रत्नागिरी येथील भूमापन क्रमांक २/१२, क्षेत्र ०.२६.००, पोटखराब ०.०१.००, एकूण क्षेत्र ०.२७.०० हे.आर., आकार ०.१२ ही जमीन श्री. गणेश शंकर कळंबटे व इतर १२ यांच्या मालकीची होती. सदर जमिनीबाबत मा. अपर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण, रत्नागिरी यांच्याकडील कुळवहिवाट दावा क्र. ५४/२०१९, आदेश दिनांक २३/०२/२०२३ तसेच आदेश क्र. एएलटी/एस.आर.३२ग-३२ओ/झरेवाडी/३९९/२०२३, दिनांक २१/०५/२०२६ अन्वये सदर जमिनीचे कुळ श्री. नितीन सुधीर जोशी हे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ३२(म) व ३२(के) च्या तरतुदीनुसार ठर L.S.P. No. 222/48 नुसार कायदेशीर खरेदीदार असल्याचे घोषित करण्यात आले असून त्यांनी विहित केलेली किंमत अनामत ठेवली आहे. या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक रत्नागिरी कार्यालयात दस्त क्रमांक RTN-5815-2026, दिनांक २७/०८/२०२६ रोजी विक्रीचे प्रमाणपत्र (सत्यप्रत) नोंदविण्यात आले आहे. त्यानुसार वरील भूमापन क्रमांकावरील जुन्या मालकांची नावे कमी करून, खरेदीदार श्री. नितीन सुधीर जोशी यांचे नाव कुळ कायद्याच्या कलम ३२(म) अन्वये खरेदी प्रमाणपत्र व नोंदणीकृत दस्ताच्या आधारे मालक म्हणून नोंद करण्यात आली.