सातबारा Watch

← धामणी

Ferfar #1753 · धामणी

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
104/अ
Talathi
सुदर्शन बलवंत डोणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.अपर जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/क्र.११७/२०२५ दिनांक:०८/०७/२०२६ प्रमाणे मौजे धामणी, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथील जमीन मिळकती बाबत फेरफार क्र.७१३ संदर्भात मा.मंडळ अधिकारी कडवई यांचा दिनांक २७/०६/२०२६ चा आदेश रद्द केला म्हणजेच सदरचा फेरफार मंजूर केला त्याप्रमाणे सदर फेरफाराप्रमाणे ०.०४.१४ क्षेत्रासाठी प्रशांत दशरथ शिवलकर यांचे नाव दाखल केले.तसेच मौजे धामणी, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथील जमीन मिळकती बाबत फेरफार क्र.१४४४ मधील मा.मंडळ अधिकारी कडवई यांचा दिनांक ०९/०७/२०१९ रोजीचा आदेश रद्द केला म्हणजेच भीमसेन चंद्रकांत चव्हाण, समिधा संजय गोरे यांची नावे कमी करणेसाठी आदेश झाला आहे.तसेच मौजे धामणी, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथील जमीन मिळकती बाबत फेरफार क्र.१५१४ मधील मा.मंडळ अधिकारी कडवई यांचा दिनांक ०२/०६/२०२१ रोजीचा आदेश तसेच मा.उपविभागीय अधिकारी संगमेश्वर यांचा आरटीएस अपिल क्र.९६/२०२३ दिनांक: ०६/१०/२०२५ कायम केला.सबब याप्रमाणे अभिलेखात बदल नाही.आदेशातील मुद्दा क्र.6 प्रमाणे नोंदणीकृत खरेदीपत्र क्र.१२६२/२००५ दिनांक:३०/१२/२००५ अन्वये ०.०४.१४ क्षेत्रासाठी प्रशांत दशरथ शिवलकर यांचे नाव दाखल केले.त्याचप्रमाणे रजिस्टर खरेदीखत क्र.५७१/२०१९ दिनांक:२८/०५/२०१९ अन्वये ०.२०५४ हे.आर.क्षेत्रासाठी भीमसेन चंद्रकांत चव्हाण, समिधा संजय गोरे यांची नावे दाखल करणेसाठी आदेश आलेवरून गाव दप्तरी अंमल होणेसाठी नोंद केली.