Ferfar #21108 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री.यशवंत रामा गांवकर यांनी वर्दी अर्ज दिला की, त्यांचे वडील कै.रामा नारायण गांवकर हे मयत झालेवर यांचा फेरफार क्र.10388 वारस रजि.अनु.क्र.3625 प्रमाणे वारस तपास होऊन 1)मुलगा-यशवंत रामा गांवकर 2)मुलगी-शकुंतला रामा गांवकर उर्फ सरस्वती वासुदेव फणसेकर यांची नावे वारस म्हणून दाखल झाली.परंतु 7/12 सदरी ए.कु.पु म्हणून यशवंत रामा गांवकर यांचे नाव दाखल झाले तरी शकुंतला रामा गांवकर उर्फ सरस्वती वासुदेव फणसेकर या वारसांची नावे 7/12 सदरी दाखल होणेकरिता वर्दी अर्ज, फेरफार क्र.10388, वारस रजि.अनु.क्र.3625 ची नक्कल प्रत,प्रतिज्ञापत्र क्र.3732/2026 दि.18/08/2026 चे प्रतिज्ञापत्र, मा.तहसिलदार साहेब मालवण यांज कडील आदेश क्र.अधि.अभि./सह.हिस्सेदार व वारसनोंदी/04/2025 दि.07/04/2025 दिलेवरून सहहिस्सेदार नोंद दाखल केली. वरील वारसाबाबत बाजूस दाखल मिळकती मध्ये फेरफार क्र.21049 प्रमाणे नोंद दाखल झाली होती,परंतु 7/12 सदरी अंमल देताना यशवंत रामा गांवकर यांचे नाव नजरचुकीने कमी झाले.तरी वरील फेरफार क्र.21049 प्रमाणे योग्य तो अंमल देणेकरीता नोंद दाखल केली.