सातबारा Watch

← रावदस

Ferfar #1650 · रावदस

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
194/1/12, 194/1/13, 194/1/15, 194/1/2, 194/1/4, 194/1/8, 194/1/9
Talathi
रजनीकांत सुर्यकांत नायकोडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 विजय सखाराम हादगे यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत हि वडिलोपार्जित आहे. सदरची मिळकत हि कै. श्रीधर महादेव हादगे यांच्या नावे दाखल होती. त्यांच्या मृत्यूपश्चात वारस तपास होऊन परुळे येथील फेरफार क्र. 6544 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 953 नुसार त्यांचे वारस 1) महादेव श्रीधर हादगे 2) कमलाकर श्रीधर हादगे 3) विमल श्रीधर हादगे 4) मंगला श्रीधर हादगे 5) सुमित्रा श्रीधर हादगे 6) वामन महादेव हादगे 7) सखाराम महादेव हादगे 8) पार्वती महादेव हादगे यांचे नाव दाखल झाले होते, एकत्र कुटुंब प्रमुख (ए. कु. प.) म्हणून सातबारा सदरी महादेव श्रीधर हादगे यांचे नाव दाखल झाले असून त्यांचे सहहिस्सेदार म्हणून फेरफार क्र. 6544 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 953 नुसार राहिलेले वारस वर नमूद 2 ते 8 यांची नावे सदर मिळकतीमध्ये सहहिस्सेदार म्हणून दाखल होण्याकरीता अर्जदार यांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र, फेरफार क्र. 6544 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 953 ची प्रत दिलेवरून सहहिस्सेदाराचे नाव दाखल करण्याकरिता नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.