Ferfar #2843 · पणदूर
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये वामन श्रीधर साईल, मंदा श्रीधर साईल,शकुंतला चंद्रकांत परब,सुनिल श्रीधर साईल व बापुजी शिवराम साईल हे खातेदार आहेत. सदर मिळकतीबाबत मा.मंत्री(महसूल), महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयात अर्जदार बापुजी शिवराम साईल यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ कलम २५८ च्या तरतुदीनुसार दाखल केलेल्या पुनर्विलोकन अर्जावर आदेश क्र.आरटीएस-२९अ२५/१४४३/प्र.क्र.२८८/जमीन-०४-अ दि.०४/०२/२०२६ पारित करण्यात आलेला आहे. सदर आदेशान्वये अर्जदार यांचा पुनर्विलोकन अर्ज मंजूर करण्यात आला असून अपर मुख्य सचिव तथा विशेष कार्य अधिकारी (अ.व.री.) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे क्रमांक आरटीएस-२९अ२४/३५४९/प्र.क्र.२९९/ज-४अ,प्र.क्र.४२८(०९) २०२४/अवपु,दि.११/०७/२०२५ हे आदेश रद्द करण्यात आले असून गाव मौजे पणदूर फेरफार क्र.१४८० व फेरफार क्र. १४९६ या नोंदी कायम करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सदर आदेशाचा गाव कागदी अंमल घेणे कामी नोंद दाखल केली असे.