Ferfar #15073 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026
लिहून घेणार : सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या., --निवडा--
लिहून देणार : विकास गंगाराम कुडाळकर रा. कुडाळ
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील वरील खातेदार श्री. विकास गंगाराम कुडाळकर हे कर्जदार श्रीम. समृद्धी रत्नाकर जोशी, कुडाळ यांचे जामीनदार आहेत.कर्जदार यांनी सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या., माणगाव या पतसंस्थेकडून रक्कम रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास हजार रुपये) कर्ज घेतले असून थकीत ठेवल्याने त्यांचेविरुद्ध सहकार कायदा कलम १०१ अन्वये कारवाई होऊन वसुली प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करूनही थकीत रक्कम भरली नाही.त्यामुळे वसुली अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचे कडील पत्र क्र. जा.क्र. सिजिसपफेसा/९५६/बोजानोंदआदेश/८५/२०२६-२७, दि. ०४/०६/२०२६ संदर्भिय पत्रान्वये जामीनदार श्री. विकास गंगाराम कुडाळकर यांचे कुडाळ येथील सामाईक जमिनीवर रक्कम रु. १,०२,८२९/- (अक्षरी एक लाख दोन हजार आठशे एकोणतीस रुपये) अधिक होणारे व्याज एवढ्या रकमेचा सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या., माणगाव यांचा बोजा इतर हक्कात नोंद करण्यात येत आहे.