Ferfar #8067 · नेमळे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/08/2026
श्री. अशोक नारायण तुळसकर यांनी वर्दी अर्ज दिला कि बाजूस कॉ नं ३ मध्ये नमूद केलेली मिळकत हि आपली काकी लक्ष्मीबाई शांताराम तुळसकर हिच्या नावे दाखल आहे.सदर मिळकतीबाबत तिने मे.दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडे दस्त क्र 781/1992 दिनांक-27/07/1992 रोजी रजिस्टर मृत्यूपत्र केलेले आहे. मृत्यूपत्र करून ठेवणार श्रीम लक्ष्मीबाई शांताराम तुळसकर या दिनांक- 13/09/2025 रोजी मयत झालेले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची संतती नाही. तरी सदर जमीन मिळकत मृत्यूपत्र करून ठेवणार श्रीम लक्ष्मीबाई शांताराम तुळसकर यांनी आपल्या हयातीत आपल्या हिस्साची मिळकत हा आपला पुतण्या श्री.अशोक नारायण तुळसकर यांचे नावे करून ठेविलेली आहे. त्यानुसार अर्जदार श्री अशोक नारायण तुळसकर यांनी अर्जासोबत नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र 781/1992 दिनांक-27/07/1992 ची नक्कल, मृत्यू दाखले,व सातबारा मध्ये भोगवटादार वर्ग 2 असल्याने मा.तहसिलदार साहेब सावंतवाडी यांजकडील ब्लॉक काढण्यासाठी चा आदेश क्र. आरटीएस/निसप्र/जमिन/नेमळे/68/2026 दि. 09/06/2026 दिलेवरून गाव अभिलेखात श्री अशोक नारायण तुळसकर यांचे नाव दाखल करणेसाठी नोंद करणेत आली.