सातबारा Watch

← भोम म्यु. हद्द

Ferfar #663 · भोम म्यु. हद्द

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-05-15
Objection until
2026-05-30
Certified
—
Gat / Survey
21/19
Talathi
किरण लक्ष्मण गजीनकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/04/2026 श्री.संजय पांडुरंग पागनीस रा.गिरगाव,मुंबई (सध्या रा. चराठे म्यु.हद्द सावंतवाडी) यांनी मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,सावंतवाडी यांनी त्यांच्याकडील फेरचौकशी अर्ज क्र. ०२/२०२१ मूळ टेनन्सी केस क्र.१४५/८९ दिनांक ३०/०३/२०२६ च्या न्यायनिर्णयामध्ये “मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण,मुंबई यांच्याकडील दिनांक ०२/०४/२०१९ रोजीच्या आदेशाने तहसीलदार यांचा मूळ कुळाचा आदेश रद्द करणेत आलेला आहे. दावाविषयक मिळकत ही सद्यस्थितीत नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट असून नगरपरिषद हद्दीत/नागरी क्षेत्रात महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९४८ च्या तरतुदी लागू होत नाहीत. सबब सदर मिळकतीमध्ये उक्त अधिनियमाच्या कलम ७०-ब अन्वये चौकशी करणे या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात नाही” याप्रमाणे निष्कर्ष नमूद करून प्रतिवादी मुकुंदराव पांडुरंग पागनीस ((मयत) वारस मुलगा – पांडुरंग मुकुंद पागनीस तर्फे कु.अ.मुलगा संजय पांडुरंग पागनीस) यांचे दिनांक ३१/१०/२०२३ व ०४/०७/२०२५ रोजीचे अर्ज मंजूर करून वादी इस्माईल इब्राहीम पाडलोसकर ((मयत) तर्फे आकिल इस्माईल शेख उर्फ पाडलोसकर यांचा मूळ फेरचौकशीचा अर्ज कामकाजातून काढून टाकल्याने तसेच मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,सावंतवाडी यांच्याकडील फेरचौकशी अर्ज क्र.०२/२०२१ मूळ टेनन्सी केस क्र.१४५/८९ अन्वये वादी इस्माईल इब्राहीम पाडलोसकर ((मयत) तर्फे आकिल इस्माईल शेख उर्फ पाडलोसकर) यांचा वारस रेकॉर्डवर घेण्यासाठीचा अर्ज नामंजूर करून पुढील न्यायालयीन प्रकिया करता येणार नसल्याने प्रस्तुत प्रकरण बंद केल्याने व निवासी नायब तहसिलदार,सावंतवाडी यांच्याकडील क्र.टेनन्सी/कावि-ग्रा.मह.अधि.सावंतवाडी ग्रामीण/कुळ नोंद/४/२०२६ दि.२९/०४/२०२६ रोजीचे स.क्र./हि.क्र.२१/१९ या जमीन मिळकती मधील कुळांची नावे ७/१२ वरून कमी करण्यासाठी पत्र प्राप्त झाल्याने त्याचप्रमाणे अध्यक्ष,महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई,यांच्याकडील क्रमांक/आरईव्ही/टेएनसी/एसएनडी/१६८/२०१८ दिनांक ०२/०४/२०१९ रोजीचा मा.तहसिलदार सावंतवाडी व मा.उपविभागीय,सावंतवाडी यांचे कूळ ठरविण्याचे आदेश काढ़ून टाकल्याबाबतचा आदेश जोडून अर्ज दिल्याने अर्जदार श्री.संजय पांडुरंग पागनीस यांच्या अर्जाप्रमाणे इनुस इब्राहिम पाडलोसकर,आकिल इस्माईल शेख,जाहीदा अब्दुल वहाब शेख,फैय्याज इस्माईल शेख,रेश्मा ताजमहंमद गनी यांची कुळ सदरी असलेली नावे कमी करण्यासाठी नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.