सातबारा Watch

← बहिरेवाडी

Ferfar #712 · बहिरेवाडी

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
158, 420, 468, 470, 570, 628
Talathi
वर्षा संजय माने
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजूस दाखल जमिनीबाबत मौजे बहिरेवाडी तालुका शाहूवाडी येथील गट नं. १५८, ४२०, ४६८, ४७०, ५७०, ६२८ बाबत तहसीलदार शाहुवाडी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे दिलेले आदेश क्र. हक्कनोंद/ वाटप/ एसआर/०५/२०२३ दिनांक २२/१०/२०२४ प्रमाणे सामायिक खातेदार मदन आनंदा लोंढे, जयंत आनंदा लोंढे व पुष्पा आनंदा लोंढे यांचे हिस्सेचे क्षेत्र पुढील प्रमाणे वाटप करणेत आले: गट नं . १५८ क्षेत्र ०.१४.०० हे. आर. व गट नंबर ४२० क्षेत्र ०.२१.०० हे. आर. पुष्पा आनंदा लोंढे यांना, गट नं . ४६८ क्षेत्र ०.०४.०० हे. आर. व गट नंबर ६२८ क्षेत्र ०.१७.२० हे. आर. मदन आनंदा लोंढे यांना, गट नं . ५७० क्षेत्र ०.०८.४० हे. आर. व गट नंबर ४७० क्षेत्र ०.१२.१० हे. आर. जयंत उर्फ जयवंत आनंदा लोंढे यांना वाटप करणेत येऊन सदर आदेशाप्रमाणे फेरफार क्रमांक ६४२ दि. १७/१२/२०२४ रोजी ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत नोंद करणेत आला. सदर फेरफार मंडळ अधिकारी भाग सरुड यांचेकडून दिनांक १०/०१/२०२५ रोजी मंजूर करणेत आला. सदर मंजूर फेरफारवर अपिलार्थी नर्मदा ज्ञानदेव पाटील, संगिता संपत पाटील, व नंदा ज्ञानदेव पाटील यांनी उपविभागीय अधिकारी पन्हाळा यांचे कोर्टात अपील दाखल केले. सदर अपिलाबाबत उपविभागीय अधिकारी पन्हाळा यांचे कोर्टातील आदेश क्रमांक क्र. आरटीएस/ अपिल क्र. / १०६/२०२५ दिनांक २०/०५/२०२६ प्रमाणे अपिलकर्ता यांचे अपिल मंजूर करणेत येऊन नोंदवलेला फेरफार क्रमांक ६४२ मंजूर करणेचा मंडळ अधिकारी यांचा निर्णय रद्द करणेत येऊन फेरफार क्रमांक ६४२ नामंजूर करणेत आला आहे. सदर फेरफारप्रमाणे ७/१२ सदरी झालेला अंमल रद्द करणेत येऊन मूळ स्थितीतील सामाईक खातेदार मदन आनंदा लोंढे, जयंत आनंदा लोंढे व पुष्पा आनंदा लोंढे यांची नावे गट नं . १५८ क्षेत्र ०.१४.०० हे. आर., गट नंबर ४२० क्षेत्र ०.२१.०० हे. आर. , गट नं . ४६८ क्षेत्र ०.०४.०० हे. आर. , गट नंबर ६२८ क्षेत्र ०.१७.२० हे. आर., गट नं . ५७० क्षेत्र ०.०८.४० हे. आर. व गट नंबर ४७० क्षेत्र ०.१२.१० हे. आर. मध्ये सामाईक खात्यामध्ये नोंद करणेसाठी आदेशाप्रमाणे नोंद केली असे.