Ferfar #8278 · बहिरेवाडी
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस दाखल मौ. बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील गट नंबर 174, 180, 185, 194, 198 व 202 मधील खातेदार श्री विक्रम वसंत भोसले रा. बहिरेवाडी ता. पन्हाळा यांनी तहसिलदार कार्यालय पन्हाळा येथे वरील 7/12 च्या इतर अधिकारात माझ्या आत्ती 1) रत्नाबाई बजरंग तांबेकर 2) शेवंता विष्णू गराडे व 3) सावित्री निवृत्ती सातवेकर यांची नावे वारस म्हणून नोंद आहेत. वरील सर्व गट नंबरला फेरफार नंबर 8150 नुसार खाते नंबर 621 मध्ये रत्नाबाई बजरंग तांबेकर व शेवंता विष्णू दराडे यांच्या वारसांची 7/12 पत्रकी नोंद झाली आहे. तसेच खाते नंबर 745 मध्ये सावित्री निवृत्ती सातवेकर यांच्या वारसांची फेरफार नंबर 8148 नुसार वारस नोंद झाली आहे. त्यामुळे वरील गट नंबरच्या इतर अधिकारात असणारी पोकळ नावे कमी करून मिळणेबाबत अर्ज केला होता. फेरफार नंबर 8148 व 8150 नुसार इतर अधिकारामध्ये असणाऱ्या वारसांची नावे कब्जेदार सदरी नोंद झाल्यामुळे इतर अधिकारातील नावे कमी करणे कामी मा. तहसिलदारसो यांचेकडील पत्र क्रमांक आरटीएस/वशि/2070(5541)/2026 दि. 29/09/2026 नुसार फेरफार नोंद केली असे.