Ferfar #8953 · धरणगुत्ती
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 344/2/3
- Talathi
- प्रविणकुमार बाळासाहेब तोडकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र. कार्या/3ब/जमीन/भोगवटा बदल/एस आर/368/2026
आदेश दिनांक : 02/10/2026
आदेशाने :- बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार पूनम संजय राऊत रा. जयसिंगपूर हे असून त्यांनी गट नं. 344/2/3 पैकी भूखंड क्र. 3, 4, 23, 24 एकूण क्षेत्र 560.00 चौ. मी. ही मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणे कामी मा.जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील जावक क्र. कार्या/3ब/जमीन/भोगवटा बदल/एस आर/368/2026 दि. 01/10/2026 रोजीचे आदेशाने पूनम संजय राऊत रा. जयसिंगपूर यांचेकडून गट नं. 344/2/3 पैकी भूखंड क्र. 3, 4, 23, 24 एकूण क्षेत्र 560.00 चौ. मी. ही मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम रु. 269640/- इतके अर्जदार यांनी डीफेस्ड चलन क्र. 0005568183202627 दि. 09/09/2026 अन्वये शासन खाती जमा केले असून अटी व शर्ती 1) भविष्यात कार्यालयीन लेखा तपासणीमध्ये जमा करणेत आलेल्या अनार्जित/अधिमुल्याच्या रक्कमेच्या फरकाची वसुली लागलेस सदर मिळकतीच्या भोगवटादार व्यक्तीस वसुलीची रक्कम भरणे बंधनकारक राहील 2) प्रस्तुत जमीन विक्री खरेदी व्यवहारामुळे खालील कायद्याचे उल्लंघन होणार नाही. अ) महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 ब) महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 क) नागरी जमीन (कमाल मर्यादा व विनियमन) अधिनियम, 1976 वरील अटीस अधीन राहून मा.जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील आदेशाप्रमाणे भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर केले असे तसी नोंद करणे कामी आले आदेशाने नोंद केली असे.