Ferfar #5360 · व्हन्नूर
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 890/ब
- Talathi
- दीपाली विठ्ठल कुंभार
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमीन/पुर्नवसन /एस.आर./08/2025
आदेश दिनांक : 14/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री सुरेश लक्ष्मण पटकारे वगैरे 2 रा.व्हन्नूर, ता.कागल,जि.कोल्हापूर यांनी मौजे व्हन्नूर, ता.कागल येथील त्यांचे मालकी वहिवाटीची भोगवटादार वर्ग 2 गट नं.890/ब एकूण क्षेत्र 2.02 हे.आर.आकारणी 7.40 रु.पै. पैकी त्यांचे मालकी वहिवाटीचे 0.40 हे.आर. क्षेत्राची जमीन “नवीन व अविभाज्य सत्ता प्रकाराने व पुनर्वसनच्या 1 ते 12 अटीस पात्र” शेरा कमी करून अर्जदार यांचे हिस्सेचे क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 करणेबाबत मा.तहसीलदारसो कागल यांचेकडे अर्ज केला होता. त्यानुसार मा.तहसीलदारसो कागल,यांचेकडील आदेश क्र.जमीन/पुर्नवसन /एस.आर./08/2025 चा आदेश दि.14/10/2026 अन्वये महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग (मदत व पुनर्वसन) यांचेकडील शासन निर्णय क्र. आरपीए – 2019/प्र.क्र.20/र-1 दिनांक 7/3/2019. महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग (मदत व पुनर्वसन) यांचेकडील शासन निर्णय क्र. आरपीए – 2019/प्र.क्र.129/र-1 दिनांक 14/10/2021 नुसार पुनर्वसन अंतर्गत मिळालेल्या मौजे व्हन्नूर, ता.कागल येथील गट न. 890/ब जमिनीचे 7/12 च्या इतर हक्कातील ‘नवीन व अविभाज्य सत्ता प्रकाराने व पुनर्वसनाच्या 1 ते 12 अटीस पात्र’ शेरा कमी करणेसाठी कब्जेहक्क रकमेची परिगणना साठी र.रु. 10,912/- आणि मोजणी फी 2000/- हि दि.12/10/2026 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शा.कागल येथे चलने शासन जमा केलेचे वरील आदेशात नोंद केले आहे. तरी सुरेश लक्ष्मण पटकारे वगैरे 2 यांचे हिस्सेपुरता ‘नवीन व अविभाज्य सत्ता प्रकाराने व पुनर्वसनाच्या 1 ते 12 अटीस पात्र’ शेरा कमी करणेसाठी आदेश प्राप्त झालेवरून नोंद केली असे. सदर वर्ग 1 केलेले क्षेत्र अतिरिक्त वाटप झालेचे भविष्यात निदर्शनास आलेस, सदर आदेश रद्द करून सदर जमीन सरकार हक्कात घेणेत येईल
मा.तहसीलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र.जमीन/पुर्नवसन /एस.आर./08/2025 चा आदेश दि.14/10/2026 प्राप्त झालेनुसार नोंद केली असे.