सातबारा Watch

← करंबळी

Ferfar #4444 · करंबळी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
839
Talathi
साजीदा अल्लाबक्ष काझी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/एसआर/154/2025 आदेश दिनांक : 10/09/2026 विनायक महादेव पाटील यांनी शंकर रामगोंडा पाटील यांचेकडून गट नंबर 839 मधील क्षेत्र हे आर 0.09.33 ची जमीन नोंदणीकृत दस्त क्रमांक 1790 दिनांक 15/06/2019 ने खरेदी घेतली होती.सदर व्यवहाराबाबत फेरफार क्रमांक 3627 नोंद घेणेत आली होती.सदरची नोंद मंडळ अधिकारी भाग कडगाव यांनी नामंजूर केलेने विनायक महादेव पाटील यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 247 व 251 अन्वये उपविभागीय कार्यालय गडहिंग्लज येथे अपिल दाखल केले होते. उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांनी अपिल मंजूर करून क्र.आरटीएस/अपील/एसआर/154/2025 दि.10/09/2026 ने आदेश पारित केला.तो पुढीलप्रमाणे “मंडळ अधिकारी भाग कडगाव यांनी दि. 30/10/2021 रोजीने फेरफार क्रमांक 3627 ची नोंद नामंजूर केलेबाबतचा निर्णय रद्द करणेत येत आहे.नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक 1790/2019 दिनांक 15/06/2019 रोजीच्या खरेदीपत्राची फेरफार पत्रकी नव्याने नोंद घेणेत यावी.त्यानुसार फेरफार प्रमाणित करणेत यावा व गट नंबर 839 चे 7/12 पत्रकी प्रतिवादी शंकर रामगोंडा पाटील यांचे नाव कमी करून त्याठिकाणी खरेदीदार अपिलार्थी विनायक महादेव पाटील यांचे नावाची नोंद करून खरेदीपत्रा प्रमाणे क्षेत्र नोंद करणेत यावे.सदर अपिलाबाबत तक्रार हरकत नसलेने आदेशाची अंमलबजावणी नियम 1971 मधील कलम 36 नुसार तात्काळ करणेत यावी” असा आदेश पारित केला आहे. खरेदी घेणार विनायक महादेव पाटील यांचे नाव हे आर 0.09.33 क्षेत्रास दाखल करणेकामी आदेशानुसार फेरफार नोंद दाखल केली असे.