सातबारा Watch

← बसर्गे बुद्रुक

Ferfar #5659 · बसर्गे बुद्रुक

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
425
Talathi
अश्विनी युवराज भोसले
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-08-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/खरेदी नियमाधीन/एसआर/07/2026 आदेश दिनांक : 14/05/2026 बाजूस दाखल केलेले गट नंबरचे खातेदार बसवराज विराप्पा हुक्केरी यांनी गट क्र. 425 खाता क्र. 2745 चे क्षेत्र हे.आर. 0.0400 दुय्यम निबंधक गडहिंग्लज यांजकडील नोंदणीकृत दस्त क्र. 392 दि. 28/01/2021 चे खरेदीपत्राने सागर जयपाल शेरवी यांना खरेदी दिली होती. सदर खरेदी क्षेत्र तुकडा असलेने संबंधीत नोंदवलेला फेरफार क्र. 4633 ची नोंद दि. 23/03/2021 रोजीने मंडळ अधिकारी भाग हलकर्णी ता. गडहिंग्लज यांनी नामंजूर केलेली होती. सदर फेरफाराचे विरुद्ध अपील होऊन मा. उपविभागीय अधिकारी सो. गडहिंग्लज यांजकडील आदेश क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/खरेदी नियमाधीन/एसआर/07/2026 दि.14/05/2026 होऊन नोंदणीकृत दस्त क्र. 392 दि. 28/01/2021 च्या दस्ताची नोंद फेरफार पत्रकी नव्याने नोंदवून फेरफार प्रमाणीत करणेत यावा व 7/12 अधिकार अभिलेख पत्रकात खरेदी घेणार सागर जयपाल शेरवी यांचे नावे 0.0400 हे.आर. क्षेत्र नोंद करून जमीन खरेदी देणार मूळ मालक बसवराज विराप्पा हुक्केरी यांचे नाव अधिकार अभिलेखातून कमी करणे कामी आदेश प्राप्त झालेवरून आदेशाने नोंद केली असे.