Ferfar #390 · मोरेवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
मौजे मोरेवाडी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हुं. नं. हू.नं .W.T.N ५६७ दि.२२/१२/५४ नुसार फेरफार नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6 (1) यातील तरतुदीनुसार अनसरून झालेले फेरफार क्र.२४१,२४२,२४३,२४४,२४५,प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्रानुसार सदरचा फेरफार हेरे सरंजाम जमीन भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे पूर्ती मर्यादित असून अन्य कोणतेही कायद्याच्या तरतुदी मधील जमिनीच्या अटी व शर्तीस लागू नाही. भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले