Ferfar #4369 · खंडोबाचीवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
मा. तहसिलदार सो पलूस यांचेकडील आदेश कर.कु.का.क.43/एसआर/17/2026 दिनांक: 03/06/2026 नुसार
कुळ कायदा कलम 43 अन्वये कुळ हक्काने प्राप्त झालेल्या जमिनीची ब्रिक्री, देणगी, अदलाबदल, गहाण पटयाने देणे किंवा अभिहस्तांतरण करणेसाठी खालील शर्तीच्या अधिन राहून कार्यवाही करणेबाबत संदर्भीय शासन परिपत्रकामध्ये निर्देश आहेत.
अ) ज्या जमिनी कुळ कायदयातील तरतूदीनूसार कुळ हक्क मान्य होवून व कुळांनी खरेदी केल्या आहेत अशा खरेदीच्या दिनांकापासून 10 वर्ष पुर्ण झालेल्या जमिनीची विक्री / देणगी / अदलाबदल / गहाण / पट्ट्याने/अभिहस्तांतरण करणेसाठी / देणेसाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
ब) शेत जमिनीची विक्री करणेपुर्वी विक्रेता जमीन महसूल आकाराचे 40पट इतकी रक्कम शासनास देईल.
क) खरेदीदार हा शेतकरी किंवा शेतकरी कुटूंबातील असला पाहीजे.
ड) खरेदी घेणार हे महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये, अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करीत नाही.
इ) मुंबई जमिनीचे तुकडे पाडणेस प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1947 याच्या तरतुदीचे उल्लंघन होणार नाही.
या पत्रात नमूद केलेल्या परिच्छेद क्र. 1 मधील अब क ड व इ या मुद्याची पुर्तता करीत असलेने खालील जमीन मालक/जमिनखरेदीदार यांचेकडून आकाराचे 40 पट र. रु. 386/- (र.रु. तीनशेरुपयेमात्र) शासकीय खजिन्यात GRN NO. MH003692118202627Mदि. 03.06.2026 रोजी भरलेने व दाखल केलेले कागदपत्राचे पुरावे पाहता व माझी खात्री झालेने, मी तहसिलदार पलूस, मला प्राप्त झाले अधिकाराचा वापर करुन, गट नंबर 203 जमीनीची विक्री परवानगी व इतर हक्कात असलेली कुळ कायदा कलम 43 ही शर्त कमी करणेबाबत आदेश पारीत करीत आहे.असा आदेश आल्यावरून इतर हक्कात अशी नोंद करणेत येत आहे.आदेश फायलीसदाखल.