सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #10335 · राजापूर

तासगाव, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1022
Talathi
RAJARAM R KARANDE
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र.RFD-31060(60)/13/2025-MRF(DeskL1)(Comp.No.1333447) आदेश दिनांक : 03/11/2025 महाराष्ट्र शासन राजपत्र दि. 03.11.2025 नुसार शासनाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश 2025 पारीत केलेला आहे.सदर अध्यादेशाप्रमाणे दि.15 नोव्हेंबर 1965 रोजी किंवा त्यानंतर आणि 15 ऑक्टोंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी या अधिनियमांच्या तरतुदींच्या विरुध्द केलेले जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे, जर अशी जमीन, कोणत्याही खऱ्याखुऱ्या अकृषिक वापराकरिता वापरली जात असेल किंवा वापरण्याचे उद्देशीत असेल तर अशा जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे, त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमाधीन करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल, अशी तरतूद केली असून मा.दुय्यम निबंधक तासगाव यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्तक्र.4317 दिनांक 30/11/1989 अन्वये लिहून घेणार 1) हणमंत बाबुराव पाटील 2) बबुताई तानाजी साळुंखे यांनी लिहून देणार दत्तू तुकाराम लोहार यांना र.रु.22000/- देऊन मौजे राजापूर येथील जमीन गट नं. 1022 मधील क्षेत्र 0.1100 आर खरेदी दिले असून अर्जदार हे प्रस्तुत जागेचा वापर निवासी वापराकरिता करीत असलेने सदर तरतुदीस अनुसरून खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.