Ferfar #4843 · सुसलाद
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- उदय सुरेश गुरव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस नमूद केलेली मिळकत श्री.संतोष गजानंद बन्नी यांच्या नावे दाखल असून, त्यांनी सदर जमीन श्री. हसन सो. जालीम सो. हुलजंती यांचेकडून खरेदी दस्त क्रमांक 2660, दिनांक 30/04/2025 अन्वये खरेदी केलेली आहे.
सदर खरेदी दस्तामध्ये खरेदीदाराचे नाव गजानंद ऐवजी जनानंद असे नमूद झाल्याने, त्यानुसार सातबारा उताऱ्यावरही खरेदीदाराचे नाव जनानंद असे नोंदविण्यात आलेले आहे.
सदर नावातील चूक दुरुस्त करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय, जत येथे दुरुस्ती लेख दस्त क्रमांक 2808, दिनांक 07/05/2025 अन्वये खरेदीदाराचे नाव जनानंद ऐवजी गजानंद असे दुरुस्त करण्यात आलेले आहे.
सदर दुरुस्ती लेखाची नोंद यापूर्वी महसूल अभिलेखात झालेली नसून, अर्जदार यांनी दुरुस्ती लेख दस्त सादर करून सदर दस्ताची नोंद घेऊन सातबारा उताऱ्यावरील खरेदीदाराचे नाव जनानंद ऐवजी गजानंद असे दुरुस्त करण्याबाबत अर्ज केलेला आहे.
त्याअनुषंगाने दुय्यम निबंधक कार्यालय, जत येथील दुरुस्ती लेख दस्त क्रमांक 2808, दिनांक 07/05/2025 अन्वये खरेदीदाराचे नाव जनानंद ऐवजी गजानंद असे दुरुस्त करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात येत आहे.