Ferfar #18079 · बिळाशी
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
आदेश क्रमांक : रे.दि.मु. नं.95/2024 नि.क्र. 10
आदेश दिनांक : 27/7/2024 तडजोड हुकुमनामा
दि. 27/7/2024 रोजी मा. श्रीमती व्ही.ए.देसाई राष्ट्रीय लोकअदालत पॅनेल प्रमुख यांचे समोर सदर दावा निघाला असता वादी तर्फे वकील ए.आंय.पठाण व प्रतिवादी तर्फे वकील ए.पी.नायकवडी यांनी दिलेल्या तडजोड पुरसीस प्रमाणे दावा निकाली करण्यात आला. यात वादी व प्रतिवादी तर्फे तडजोड पुरसीस खालीलप्रमाणे
१)रियाज निजाम मुलाणी वादी
२)लतीफ बाळूभाई मुलाणी वादी
३) फिरोज बाळूभाई मुलाणी वादी
विरुद्ध
१) नूरजहाँ मोहिद्दीन मुल्ला प्रतिवादी
२) न्यामत सिकंदर जमादार प्रतिवादी
३) शबिरा इब्राहीम पठाण प्रतिवादी
यांच्यात मौजे बिळाशी येथील शेतजमिनीचे खालीलप्रमाणे तडजोड हुकूमनामा झालेला आहे.
1)गट नं. 310/1/ब मधील हिस्सा क्षेत्र हे १ .३६६६ आर
2) गट नं. 311/8/ब मधील हिस्सा क्षेत्र हे ०.०४५० आर
3) गट नं. 146/1 मधील हिस्सा क्षेत्र हे ० .१०६६ आर
4) गट नं. 18/2/1/ब मधील हिस्सा क्षेत्र हे ० .०७ आर
प्रतिवादी नं.१ ते ३ यांनी त्यांचा दावा मिळकतीतील हिस्स्यापैकी ½ हिस्सा वादी नं. १) रियाज निजाम मुलाणी यांना व प्रत्येकी ¼ हिस्सा वादी नं २)लतीफ बाळूभाई मुलाणी व ३) फिरोज बाळूभाई मुलाणी यांना सदर तडजोड हुकुमनामाद्वारे (हिब्ब्याने) वादी नं.१ व २ करिता कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.
येणेप्रमाणे हुकूमनामा असे.
तडजोड हुकूमनामा फाईलीस दाखल असे.