Ferfar #23249 · म्हैसाळ (एस)
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 810
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.टेनन्सी/४३ शर्त /एस आर-१५/२०२६
आदेश दिनांक : 30/09/2026
मा तहसिलदार मिरज यांचे कडील आदेश क्र.टेनन्सी/४३ शर्त /एस आर-१५/२०२६ दिनांक :- ३०/०९/२०२६ चे अन्वये म्हैसाळ येथील सर्वे नं ३५४/२ चा नवीन गट नं ११५० चा चालू गट नं ८१० चे क्षेत्र ३ हे ९२ आर पो ख ० हे ०२ आर आकार ३१ रु ७० पैसे या मूळ कुळ आप्पा भाऊ शिंदे यांनी फे.नं ३६१७ दिनांक २१/०९/१९६३ यांनी जुना सर्वे नं ३५४/२मधील जमिनीकरिता ठरवून दिलेली रक्कम रु २५७६.५० /- हि दिनांक ३१/०५/१९७० अखेर आठ हफ्त्यामध्ये भरणेची असून त्यानुसार त्यांचे कुळ म्हणून दाखल असलेले नाव कमी करून कब्जेदार सदरी मालक म्हणून दाखल केलेचे दिसून येते, प्रमाणे कुळ कायद्याने धारण केली आहे,तसेच यास ३२ एम प्रमाणपत्र मिळून १० (दहा)वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे,तसेच फेरफार क्रमांक २२८७ दिनांक १९/०५/१९८३ चे अवलोकन केले असता ,मूळ कुळ आप्पा भाऊ शिंदे यांनी दिनांक १९/०५/१९८३ रोजी जुना सर्वे नं ३५४/२ चा नवीन गट नं ११५० मध्ये एकट्याचे नाव दाखल असुन आपला भाऊ श्री बापू भाऊ शिंदे यांची समाइकात आठ आणेची वहिवाट आहे,त्याप्रमाणे त्यांचे नाव आठ आणे हिस्सेस नमूद करणेत आलेले आहे,मूळ कुळ आप्पा भाऊ शिंदे हे दिनांक ०१/०८/२०२१ रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी दिनांक ०८/०४/२००९ रोजी मयत झाली असून फेरफार नं २०२२४ ने त्यांच्या मुली सौ.विलासिनी गजानन लंगोटे व सौ,सुहासनी अशोक शाडंगे यांची नावे लागली असून फेरफार नं २२८७ ने आठ आणे हिस्स्यास लागलेले नाव श्री बापू भाऊ शिंदे हे दिनांक ०३/०१/२०२० रोजी मयत झाले असून त्यांचे पश्चात दिनांक २५/०३/२०२५ रोजी रजिस्टर वाटप पात्राप्रमाणे फेरफार नं २२२९० प्रमाणे श्री प्रकाश बापू शिंदे ,व किरण बापू शिंदे यांची नावे आहेत, त्यामुळे ७/१२ चे इतर हक्कातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करणे व भोगवटादार वर्ग २ ऐवजी भोगवटादार वर्ग १ करिता अर्जदार आप्पा भाऊ शिंदे मयत यांचे वारसदार व बापू भाऊ शिंदे मयत यांचे वारसदार किरण बापू शिंदे वैगरे ३ यांनी सदर जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराणा रक्कम ग्रास प्रणाली अंतर्गत संगणकीय चलन नं MH006594802202627M अन्वये र रु १२६८/- दिनांक :- १८/०७/२०२६ रोजी शासनास जमा केली असुन सदरचे चलन Defacement No.000377355202627 दिनांक :- २१/०७/२०२६ रोजी झाले असल्याने गट नं ८१०चे इतर हक्कातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन व नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी केला ,नोंद आदेशावरून केली, आदेश फायलीस दाखल