Ferfar #56049 · चोपडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-02-06
- Objection until
- 2026-02-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/2/अ/1, 121/2/अ/2/1
- Talathi
- गणेश राजाराम महाजन
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/02/2026
म. तहसिलदार सो चोपडा यांचेकडिल शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार चोपडा यांचे न्यायालय चोपडा यांनी चोपडा शिवारातील गट नं 121/2/अ/2/1 क्षेत्र 1.04 हे. आर, गट नं 121/2/अ/1 क्षेत्र 0.81 हे. आर. यांचा खालीलप्रमाणे आदेश पारीत केला आहे.
आदेश
1) वादी यांचा दावा मंजूर करणेत येत आहे.
2) मौजे चोपडा ता. चोपडा येथील गट नं.121/2/3/1 क्षेत्र 0.81 हे. आर. आकार रू.3.10 पैसे या मिळकतीचे खरेदीखत दस्त क्रमांक 3677/2020 व मौजे चोपडा येथील गट नं. 121/2/अ/2/1 क्षेत्र 1.04 हे. आर. आकार रू.9.64 पैसे या मिळकतीचे खरेदीखत दस्त क्रमांक 3678/2020 खरेदीखताद्वारे उक्त मिळकतीची विक्री झालेली आहे. सामनेवाले इस्माईल इसाक बागवान व हिना इस्माईल बागवान हे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 तरतुदीन्वये शेतकरी नसल्याचे दिसून येते, तरतुदीचे उल्लंघन केलेले आहे. उक्त खरेदीखताद्वारे झालेला व्यवहार हा कलम 84 क पोट कलम (1) नुसार विधीग्राहय (Invalid) असल्याचे आदेशाद्वारे ठरविण्यात येत आहे.
3) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 च्या कलम 84 क पोट कलम (3) अन्वये उक्त शेत जमीन सरकार जमा करण्यात येत आहे.
4) प्रस्तुत प्रकरणी मौजे चोपडा शिवारातील गट नंबर 121/2/अ/2/2 या मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांनी पारित केलेल्या आदेशाविरूध्द मा. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण छ. संभाजीनगर येथे दाखल असलेला sr. No. 14 Case No.48 B/2024 Jalgaon चा अंतिम निर्णय सर्व संबंधितावर बांधील राहिल.
शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार चोपडा यांचे न्यायालय चोपडा यांचेकडिल आदेश क्र. कुळकायदा केस क्र. 02/2025 व निकाल सुचना EQJ NO 258/2025 दि. 01/12/2025 आलेवरून नोंद केली असे.