Ferfar #3909 · मेळसांगवे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- निकिता शशिकांत जाधव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026अर्जदार श्री. युवराज देविदास पाटील वगैरे, रा. मेळसांगवे ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यांनी मौजे मेळसांगवे ता. मुक्ताईनगर येथील गट नं. 20 क्षेत्र 2 हे. 79 आर + पो.ख. क्षेत्र 0 हे. 03 आर आकार 13 रु. 25 पैसे या मिळकतीवरील कुळकायदा कलम 43 अंतर्गत नियंत्रित सत्ता प्रकार, नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करुन जमीनीची भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग-1 होणेबाबत विनंती केलेली आहे.
महाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. टिएनसी- 04/2013/प्र.क्र. 196/ज-1, दि. 07 मे 2014 नुसार मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 च्या पूर्व परवानगीची अट शिथील करण्यात आलेली आहे. परिपत्रकातील परिच्छेद क्रं. 6 मध्ये उक्त जमिनीची विक्री न करता, अशा विक्रीपूर्वीच एक कायमस्वरुपी सोय म्हणून किंवा भविष्यातील अडचणी व वेळ वाचविण्याच्या हेतूने अर्जदार यांनी सदर गटावरील शर्त कमी करणेची विनंती केलेली आहे. संदर्भ क्रं. 2 व 3 वरील शासन परिपत्रकानुसार, मौजे मेळसांगवे ता. मुक्ताईनगर येथील गट नं. 20 क्षेत्र 2 हे. 79 आर + पो.ख. क्षेत्र 0 हे. 03 आर आकार 13 रु. 25 पैसे या शेत मिळकतीचे गांव नमुना नं. 7/12 उताऱ्यावरील कुळकायदा कलम 43 अंतर्गत दाखल नियंत्रित सत्ता प्रकार, नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करुन मिळकत कृषक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग- 1 करणेकामी खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे.
बाबत मा तहसीलदार सो मुक्ताईनगर यांचे कडील आदेश क्र.कुळका/कावि/६९२/२०२६ दि.२६/१०/२०२६ आदेशान्वये नोंद केली असे.